इस्रोनं अखेर इनसॅट-३डीएस (INSAT-3DS) यशस्वीरित्या (ISRO Weather Satellite) लाँच केलं. या उपग्रहाच्या माध्यमातून भारताला हवामानाची अचूक माहिती गोळा करणे सोपे होणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. हे जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल F14 (GSLV-F14) वर लॉन्च करण्यात आले.
[read_also content=”सारा अली, अनुष्का शर्मा ते उर्मिला मातोंडकर यांचं ओटीटी विश्वास पदार्पण! धमाकेदार चित्रपटांची मिळणार मेजवानी https://www.navarashtra.com/movies/sara-ali-khan-anushka-sharma-urmila-matondkar-will-have-ott-debut-2024-nrps-508209.html”]
या उपग्रहाचे मिशन लाइफ 10 वर्षे आहे. म्हणजेच पुढील दहा वर्षे हवामानातील सर्व बदलांची माहिती देत राहील. या उपग्रहावर सुमारे 500 कोटी रुपये खर्च झाले आहेत. एकदा वर्किंग मोडमध्ये आल्यावर, ते वादळ तसेच जंगलातील आग, हिमवर्षाव, धूर आणि बदलते वातावरण याबद्दल माहिती देईल. या उपग्रहाचा उद्देश पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आणि महासागर निरीक्षणांच्या अभ्यासाला चालना देणे हा आहे. ५१.७ मीटर उंच GSLV-F14 रॉकेट येथून सोडण्यात आले. या उपग्रहाचे वजन 2,274 किलो आहे. उपग्रहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामगिरी सामान्य असून पेलोड बेअरिंग देखील वेगळे करण्यात आले आहे.
ISRO ने सांगितले की 2,274 किलो वजनाचा उपग्रह भारतीय हवामान विभाग (IMD) सह पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांना सेवा देईल. 1 जानेवारी रोजी PSLV-C58/Exposet मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर 2024 मध्ये ISRO ची ही दुसरी मोहीम आहे.






