Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘‘हिंदू हो क्या, तुम कश्मीर…”; पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्याने म्हटलं की…, महाराष्ट्रातील तरुणाने केला धक्कादायक खुलासा

जालना जिल्ह्यातील आदर्श राऊत यांनी 21 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्याबबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एक फूड स्टॉलवर झालेल्या संभाषणाबाबत भाष्य केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2025 | 04:27 PM
‘‘हिंदू हो क्या, तुम कश्मीर…”; पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्याने म्हटलं की…, महाराष्ट्रातील तरुणाने केला धक्कादायक खुलासा
Follow Us
Close
Follow Us:

जालना: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झाला आहे. या हल्ल्यासंदर्भात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. भारत सरकार आक्रमकपणे पावले उचलत आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील एक युवकाने मोठा गौप्यस्फोट केला आहे.  पहलगाम हल्ल्यातील संशयित प्रकरणातील हल्लेखोराने हल्ल्याच्या एक दिवस आधी माझ्याशी बोलले असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

जालना जिल्ह्यातील आदर्श राऊत यांनी 21 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्याबबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एक फूड स्टॉलवर झालेल्या संभाषणाबाबत भाष्य केले आहे. यावेळेस आदर्श राऊत म्हणाले की एका व्यक्तीने मला हिंदू आहेस का? काश्मीरचा दिसत नाहीस असे विचारले होते. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे स्केच जारी केले होते. त्यातील एकाने हे प्रश्न विचारले असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे.

आदर्श राऊत यांच्या म्हणण्यानुसार, 21 एप्रिल रोजी ते पहलगाम येथे घोडेस्वारी करण्यासाठी आले होते. त्यावेळेस ते एका मॅगी स्टॉलवर थांबले होते. तेव्हा एक माणूस त्यांच्याजवळ आला आणि त्याने मला हिंदू आहे का असे विचारले. तसेच तुम्ही काश्मिरी दिसत नसल्याचे देखील तो म्हणाला. त्यानंतर तो व्यक्ती त्याच्या साथीदाराकडे वळून आज गर्दी कमी असल्याचे म्हणाला.

नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने मी मॅगी स्टॉलच्या मालकाला पैसे देऊ देऊ शकलो नाही. मी त्याचा मोबाइल नंबर घेतला आणि खाली नेटवर्कमध्ये आल्यावर त्याचे पैसे पाठवले. ही माहिती एनआयएला आदर्श राऊत यांनी दिल्याचे समजते आहे. मात्र अजून एनआयएने त्यांना संपर्क केला नाही. जर त्यांना काही माहिती हवी असल्यास मी देईन असे आदर्श राऊत यांचे म्हणणे आहे.

पहलगाम हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. सिंधु जल करार स्थगित केला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत महत्वाची बैठक घेत भारतीय सुरक्षा दलांना फ्री हँड दिला आहे.

 मोदींकडून सैन्याला फ्री हँड, पाकिस्तानमध्ये घबराट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या महत्वाच्या बैठकीत तीनही सैन्याचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाला देखील उपस्थित होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. यावेळेस अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.

आज काहीतरी मोठं घडणार! आपल्याकडे वेळ कमी अन्…; PM मोदींकडून सैन्याला फ्री हँड, पाकिस्तानमध्ये घबराट

या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलांवर पूर्ण विश्वास दर्शवला आहे. तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी योग्य वेळ, तारीख तुम्हीच सेट करा असे निर्देश देखील पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे आता लष्कराला कारवाईसाठी पूर्ण मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्य दले कोणती कारवाई करणार आणि पाकिस्तान त्याला कसे प्रत्युत्तर देणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला खुली सूट दिली आहे. पाकिस्तानला धडा शिकवणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावे. त्यात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. या बैठकीनन्यत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मोदी आणि शहा यांच्यात महत्वाची बैठक होत आहे. त्यामुळे आज काहीतरी मोठा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title: Jalna adarsh raut said before pahalgam terror attack suspected attacker asked him he was a hindu nia jammu kashmir pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 04:27 PM

Topics:  

  • indian army
  • Modi government
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड
1

भारताने पराभव स्वीकारावा…! पुन्हा पाकिस्तानच्या ‘या’ बड्या अधिकाऱ्याने केली आगपाखड

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
2

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?
3

सीताकुंड ते महेशखली…ISI चा बांगलादेशातील हिंदू मंदिरांवर ‘घातक डाव’,चंद्रनाथ धामवर मशीद बांधण्याचा कट?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’
4

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.