पंतप्रधान नरेंद्र मोदींची लष्कराला खुली सूट (फोटो- ट्विटर)
Pahalgam Terror Attack: पहालगाम येथील दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झाला आहे. या हल्ल्याचा बदल घेण्याची मागणी देशभरातून केली जात आहे. दरम्यान भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली आहे. तर सिंधु जल करार स्थगित केला आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक पार पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या महत्वाच्या बैठकीत तीनही सैन्याचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाला देखील उपस्थित होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. यावेळेस अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलांवर पूर्ण विश्वास दर्शवला आहे. तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी योग्य वेळ, तारीख तुम्हीच सेट करा असे निर्देश देखील पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे आता लष्कराला कारवाईसाठी पूर्ण मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्य दले कोणती कारवाई करणार आणि पाकिस्तान त्याला कसे प्रत्युत्तर देणार हे येत्या काळात पहावे लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला खुली सूट दिली आहे. पाकिस्तानला धडा शिकवणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावे. त्यात कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. या बैठकीनन्यत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. मोदी आणि शहा यांच्यात महत्वाची बैठक होत आहे. त्यामुळे आज काहीतरी मोठा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.