Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu- Kashmir Politics: जम्मू-कश्मीर विधानसभेत राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर

आज विधानसभेचे कामकाज सुरू होताच, जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्राने रद्द केलेला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मांडला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 06, 2024 | 03:50 PM
Jammu- Kashmir Politics: जम्मू-कश्मीर विधानसभेत राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर
Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर : केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करत  जम्मू आणि कश्मीर या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत राज्याती काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स बहुमताचा आकडा पार करत विजय मिळवला. निकालानंतर  जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 बहाल करण्याच्या प्रस्तावावरून गदारोळ झाला. या गदारोळात, पूर्वीच्या राज्याचा विशेष दर्जा बहाल करण्यासाठी केंद्राने निवडून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

आज विधानसभेचे कामकाज सुरू होताच, जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्राने रद्द केलेला जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा बहाल करण्याचा प्रस्ताव मांडला.”ही विधानसभा जम्मू आणि काश्मीरच्या लोकांची ओळख, संस्कृती आणि हक्कांचे संरक्षण करणाऱ्या विशेष दर्जाच्या आणि घटनात्मक हमींच्या महत्त्वाची पुष्टी करते आणि त्यांना एकतर्फी काढून टाकल्याबद्दल चिंता व्यक्त करते,” असे उपमुख्यमंत्री चौधरी यांनी आज मांडलेल्या ठरावात म्हटले आहे. ”

हेही वाचा: Rahul Gandhi : देशाच्या संविधानाला आणि एकात्मतेला अदृश्य शक्तींचा धोका; संविधान सन्मास संमेलनात राहुल गांधी यांचा

इतकेच नाही तर, ठरावात म्हटले आहे की, “ही विधानसभा पुनर्स्थापनेच्या कोणत्याही प्रक्रियेत राष्ट्रीय एकता आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या न्याय्य आकांक्षा लक्षात ठेवण्यावर भर देते.” दरम्यान, विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी हा प्रस्ताव सूचीबद्ध कामाचा भाग नसल्याचे सांगत विरोध केला. “आम्ही प्रस्ताव नाकारतो,”

4 नोव्हेंबरला देखील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (पीडीपी) आमदार वाहिद पारा यांनी सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात ठराव मांडला होता. पूर्वीच्या राज्याला दिलेला विशेष दर्जा बहाल करण्याची मागणी केल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

हेही वाचा: ‘एकदा संधी देऊन पाहा, विकास काय असतो हे संपूर्ण मतदारसंघाला दाखवून देतो

काय होते कलम 370?

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० ही भारतीय राज्यघटनेची तरतूद होती.
या अंतर्गत जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्यघटना होती.
या अंतर्गत कलम 1 व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरला कोणतेही कलम लागू नव्हते.
विशेष राज्याचा दर्जा मिळाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये घटनेचे कलम 356 लागू होत नव्हते.
देशाच्या राष्ट्रपतींना जम्मू-काश्मीरची राज्यघटना रद्द करण्याचा अधिकार नव्हता.

कलम 370 ची अंमलबजावणी कशी झाली?

राज्याच्या निर्णयांमुळे देशातील सरकार विस्कळीत होत असे. देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी 5 महिन्यांच्या दीर्घ वाटाघाटीनंतर कलम 370 चा संविधानात समावेश केला. त्यासाठी 1951 साली जम्मू-काश्मीरमध्ये संविधान सभा स्थापन करण्यात आली. त्यात 75 सहस्य होते.

Web Title: Jammu and kashmir assembly passes resolution to grant special status to state nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 03:49 PM

Topics:  

  • Congress
  • jammu kashmir

संबंधित बातम्या

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
1

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
2

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात
3

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती
4

Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.