File Photo : Anil Sawant
पंढरपूर : पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील बेरोजगारी व विविध विकासाचे प्रक्ष हे वेगळे असून, आजपर्यंत ज्यांनी सत्ता उपभोगली त्या लोकांनी मतदारसंघातील जनतेला फसवण्याचेच काम केले आहे. हा दोन्ही तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी शरदचंद्रजी पवार यांनी मला संधी दिली. त्यामुळे तुम्ही एकदा मला संधी देऊन पाहा. मतदारसंघात विकास काय असतो हे सर्वांना दाखवून दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नसल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : भाजप व मनसेची छुपी युती? अमित ठाकरेंनंतर आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, प्रचार देखील करणार
मंदिरामध्ये आपल्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यकमाप्रसंगी आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादीचे राहुल शहा यांच्या शुभहस्ते सिद्धेश्वर मंदिरामध्ये नारळ वाढवून अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार धैर्यशील मोहिते पाटील होते.
अध्यक्षीय भाषणात धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, देशात हुकूमशाही सरकार आले असून, महिलांसाठी दिलेले पैसे सरकार दुसऱ्या बाजूने काढून देखील घेत आहे. सगळ्या बाजूने हे सरकार आपली पिळवणूक करत असल्याचे दिसत आहे. राज्यात देशात एवढी महागाई वाढवली आहे. की सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. नुसती घोषणाबाजी करून प्रत्येक समाजाची फसवणूक केली आहे. जाती-धर्मात जातीय तेढ निर्माण करून मांडणे लावली जात आहेत. अशा सरकारला पायउतार करून जागा दाखवून देण्याची गरज आहे. त्यामुळे आपण महायुतीचे आणि सावंत यांना भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन मोहिते पाटील यांनी केले.
3 हजार कोटींचा निधी मतदारसंघात
प्रा. लक्ष्मनराव ढोबळे बोलताना म्हणाले की, 3 हजार कोटींचा निधी मतदारसंघात आला आहे. तर कामे कुठे कुठे झाली आहेत याची माहिती चाबी, डिजिटल बोर्ड लागाये, आता आजी आमदार यांना माजी करून घरी बसवावे, असे आवाहन माजी मंत्री ढोबळे यांनी केले.
अनेक विकासाचे प्रश्न अजून बाकी
सर्वसामान्य जनतेला आमदाराची भेट होत नाही, असा हल्लाबोल देखील केला. राहुल शहा बोलताना म्हणाले की, सर्वांना विश्वासात घेऊन अनिल सावंत यांना उमेदवारी दिली. पूर्वीपासून हा मतदारसंघ शरद पवार यांना मानणार आहे. या दोन्ही तालुक्यात मोठचा मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे. मंगळवेढा तालुक्यातील अनेक विकासाचे प्रश्न अजून बाकी आहेत.
हेदेखील वाचा : “राहुल गांधींभोवती अर्बन नक्षलवादी लोकांचा घोळका, लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देतात?” देवेंद्र फडणवीसांची टीका