Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu Kashmir Blast : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचं पथक गस्त घालताना स्फोट; २ जवान शहीद, एक जखमी

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात 2 जवान शहीद झाले, तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 11, 2025 | 08:19 PM
जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराचं पथक गस्त घालत असताना स्फोट; २ जवान शहीद, एक जखमी

जम्मू-कश्मीरमध्ये लष्कराचं पथक गस्त घालत असताना स्फोट; २ जवान शहीद, एक जखमी

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात 2 जवान शहीद झाले, तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता जम्मू जिल्ह्यातील खोर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केरी बट्टल परिसरात नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट झाला. यामध्ये तीन सैनिक जखमी झाले, ज्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Supreme Court on EVM : ‘तोपर्यंत EVM मधील डेटा हटवायचा नाही’; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराचे पथक गस्त घालत होते. यावेळी दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. त्यात तीन जवान जखमी झाले. माहिती मिळताच, अतिरिक्त लष्करी तुकडी घटनास्थळी पोहोचली आणि जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. स्फोटानंतर लगेचच संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे.

याच्या एक दिवस आधी, सोमवारी, राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबारात एक लष्करी जवान गंभीर जखमी झाला होता. नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात एका अग्रेषित चौकीवर तैनात असलेल्या या जवानाला गोळी लागली आणि त्याला ताबडतोब लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या माहितीनुसार दुपारी २.४० वाजता नियंत्रण रेषेपलीकडून गोळीबार झाला.

याआधी ८ फेब्रुवारी रोजी, केरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या जंगलातून दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला होता, जे या बाजूला घुसण्याची संधी शोधत होते. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल काही गोळीबार केला आणि त्यानंतर परिसरात नजर ठेवण्यासाठी घुसखोरीविरोधी पथकाकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

‘येताना आपल्या विमानातून काही महिला आणि मुलांना घेऊन या..’; अखिलेश यादवांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

नियंत्रण रेषेजवळ सापडला शस्त्रास्त्रांचा साठा

कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील कर्नह भागात सोमवारी सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नह तहसीलमधील बडी मोहल्ला अमरोही येथे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी एक एके ४७ रायफल, एक एके मॅगझिन, एक सायगा एमके रायफल, एक सायगा एमके मॅगझिन आणि १२ राउंड जप्त केले.

Web Title: Jammu kashmir blast 2 soldiers martyred near loc ied blast one injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • IED Blast
  • indian army
  • Jammu Kashmir News

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?
2

Pakistani Terrorism: पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद का थांबू शकत नाहीत; काय आहे खरे कारण?

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान
3

Asia Cup 2025 Final : सूर्या दादा मानलं तुला…आशिया कपमधील सर्व कमाई भारतीय सैन्याला केली दान

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…
4

जम्मू काश्मीरमध्ये थरार! Indian Army ने 7 दहशतवाद्यांना घेरलं; उधमपुर अन् किश्तवाडमध्ये सैन्याने थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.