Jammu-Kashmir News:
Jammu-Kashmir News: जम्मू आणि काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या भागात आणखी दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने लष्कराची कारवाई अद्यापही सुरूच आहे. घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. भारतीय लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. शोध मोहीम वेगाने सुरू आहे. गेल्या काही वर्षात सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया वेगाना वाढत चालल्या आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली. लष्कराच्या संयुक्त कारवाईदरम्यान, लष्कर आणि पोलिसांनी वारसन परिसरातील ब्रिजथोर जंगलात दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांनी दोन एके-सिरीज रायफल, चार रॉकेट लाँचर, दारूगोळ्याचा मोठा साठा आणि इतर युद्ध साहित्य जप्त केले.परिसरात लपलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
Women’s World Cup : दक्षिण आफ्रिकेने लावली विजयाची हॅटट्रिक! बांग्लादेशला 3 विकेट्सने केले पराभूत
कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर जंगलातही सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये यापूर्वी चकमक झाली होती. त्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले होते, तर दोन सैनिक शहीद झाले होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख अमीर अहमद दार अशी झाली आहे, जो शोपियानचा रहिवासी आहे, जो लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता आणि सप्टेंबर २०२३ पासून सक्रिय होता. पहलगाम हल्ल्यानंतर सोडण्यात आलेल्या १४ वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.
दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. लष्कराने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जोरदार चकमकी सुरू झाल्या, त्यात दोन दहशतवादी ठार झाले. हा घुसखोरीचा हा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू असलेल्या युद्धबंदी उल्लंघनाचा आणि दहशतवादी कारवायांना उत्तेजन देण्याच्या प्रयत्नांचा भाग असू शकतो,असेही सांगितले जात आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्करी कारवाई, सुरक्षा दल दहशतवाद्यांविरुद्ध, त्यांचे सहकारी आणि समर्थकांविरुद्ध सतत मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आता केवळ बंदूकधारी दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी दहशतवादाची संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी दहशतवादविरोधी रणनीतीतील बदल करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कारवाईचा हा एक भाग आहे. सुरक्षा दलाकडून दहशतवादी आणि त्यांचे समर्थक, त्यांना सहानुभूती देणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ड्रग्ज तस्कर आणि हवाला रॅकेटना देखील लक्ष्य केले जात आहे, या हवाला रॅकेटच्य माध्यमातून निर्माण केलेला पैसा दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरला जातो.
Nashik Crime: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, एकाला 6 कोटी आणि तर दुसऱ्याला
या वसंत ऋतूमध्ये भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दल (BSF) नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) २४/७ देखरेख ठेवली जात आहे. हिवाळी बर्फवृष्टीच्या हंगामात सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करता येणार नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये ७४० किलोमीटर लांबीची नियंत्रण रेषा (LoC) आहे, जी लष्कराद्वारे संरक्षित आहे आणि २४० किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा (IB) आहे, जी बीएसएफद्वारे संरक्षित आहे.
नियंत्रण रेषा (LoC) खोऱ्यातील बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये आणि जम्मू विभागातील राजौरी, पूंछ आणि जम्मू जिल्ह्यांच्या काही भागात आहे. पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटना, पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने, दहशतवाद टिकवून ठेवण्यासाठी शस्त्रे, दारूगोळा, रोख रक्कम आणि ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी ड्रोनचा वापर करतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, या वस्तू दहशतवादी संघटनांकडून गोळा केल्या जातात. बीएसएफ ड्रोनविरोधी उपकरणे तैनात करत आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडून पाठवल्या जाणाऱ्या ड्रोनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.