फोटो सौजन्य - ICC Cricket World Cup
दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश : महिला विश्वचषकामध्ये खराब कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या स्पर्धेमध्ये दमदार कमबॅक केला आहे. संघाने पहिल्या पराभवांनंतर एकही सामना न गमावता विजयाची हॅटट्रिक नावावर केली आहे. काल त्याचा सामना हा बांग्लादेशविरुद्ध झाला या सामन्यामध्ये त्यांनी बांग्लादेशच्या संघाला 3 विकेट्सने पराभुत करुन सामना जिंकला. २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली.
एका रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा तीन विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने सहा विकेट्स गमावत २३२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने २३३ धावांचे लक्ष्य शेवटच्या षटकात गाठले संघाकडून क्लो ट्रायॉनने शानदार फलंदाजी केली आणि ६९ चेंडूत ६२ धावा केल्या. मॅरिझाने कॅपने ५६ धावांचे योगदान दिले. बांगलादेशच्या गोलंदाजांनी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न केले, परंतु त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.
India vs West Indies : आता कुलदीप यादवचे राज! मोहम्मद सिराजला धोबीपछाड देत पटकावले अव्वल स्थान
२३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. ताजमिन ब्रिट्स धाव न करता बाद झाली. त्यानंतर लॉरा वोल्वार्ड तिच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवू शकली नाही आणि ती ३१ धावांवर धावचीत झाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव डळमळीत झाला आणि ७८ धावांत पाच विकेट गमावल्या. तथापि, मॅरिझाने कॅप आणि क्लो ट्रायॉन यांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला.
कॅपने ७१ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची दमदार खेळी केली. दरम्यान, ट्रायॉनने ६९ चेंडूंमध्ये ६२ धावा केल्या. ट्रायॉनने तिच्या डावात सहा चौकार आणि एक षटकार मारला. नॅडिन डी क्लार्कने शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली आणि २९ चेंडूंमध्ये नाबाद ३७ धावा केल्या, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला तीन चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठता आले.
A nail-biting finish in Visakhapatnam sees South Africa come out on top against Bangladesh 🙌#CWC25 | #SAvBAN 📝: https://t.co/A9QQ7WC9z4 pic.twitter.com/Elf1BY08E7 — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 13, 2025
तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. फरगाना हक आणि रुबिया हैदर यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. कर्णधार निगार सुलतानाने ३२ धावांचे योगदान दिले. शर्मिन अख्तरने शानदार फलंदाजी केली आणि ७७ चेंडूत ५० धावा केल्या. दरम्यान, शोर्ना अख्तरने जलदगती खेळी करत ३५ चेंडूत ५१ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये रितू मोनीने फक्त ८ चेंडूत १९ धावा केल्या, ज्यामुळे संघाला ५० षटकांत एकूण २३२ धावा करता आल्या.