नाशिक: नाशिक मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सायबर ठगांनी डिजिटल अरेस्टच्या माद्यमातून दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. यात एका ज्येष्ठ नागरिकाला ६ कोटींनी लुटण्यात आला तर दुसऱ्याला ७२ लाखांचा चुना लावल्याचं समोर आलं आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील
फोटो व्हायरल झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्ट केलं आणि हे पैसे उकळले.
या दोन्ही प्रकरणात विशेष असे की भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाईन हजर करत असल्याचं भासवण्यात आलं. एवढच नाही तर भीती दाखवून हे पैसे उकलण्यात आल्याचं समोर आलं आहे. घाबरलेल्या नागरिकांनी आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे भरण्यास भाग पडल्याचं समोर आलं आहे.
काय सांगून लुटण्यात आलं?
पहिलं प्रकरण हे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिका सोबत घडली. त्यांना एक व्हिडीओ कॉल आला. त्याच्या सिमकार्डच्या माध्यमातून अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याचं त्यांना सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकारामुळे तो ज्येष्ठ नागरिक घाबरला. याच परिस्थितीची संधी घेत ६ कोटी रुपये ट्रान्स्फर करायला भाग पाडलं.
दुसऱ्या प्रकरणात अनिल लालसरे या ज्येष्ठ नागरिकाला ७२ लाखांचा गंडा घालण्यात आला. तुमच्या आधारकार्डवरून क्रेडिट कार्ड इशू झाले असून त्या माध्यमातून गैरव्यवहार झाला असल्याची भीती त्याला घालण्यात आली. त्यामुळे ७२ लाख रुपयांचा दंड भरला नाही तर सीबीआयचे पथक अटक करून दिल्लीला घेऊन अशी दमबाजी करण्यात आली. त्यामुळे लालसरे यांनी ७२ लाख रुपये आरटीजीएस केले आहे. या दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
आजीच्या डोळ्यादेखत आठ वर्षीय चिमुरडीचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू
नाशिक शहरातून एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. यात दुचाकीवरून आजीसोबत जात असलेल्या आठ वर्षांच्या नेव्हीने नेरकर या चिमुरडीचा, भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि. ११) सकाळी, पाईपलाईन रोडवरील रिलायन्स जिओ पेट्रोलसमोर घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून ट्रक जप्त केला आहे. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. ट्रक चालक अपघातानंतर फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.
Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा गेम ओव्हर; पोलिसांनी परदेशात लावली फिल्डिंग, आता थेट…