
जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई
काश्मीर टाइम्सच्या ऑफिसमधून शस्त्रास्त्रे जप्त
एके 47 आणि पिस्तूल केले जप्त
जम्मू काश्मीरमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी राज्यातील काश्मीर टाइम्सच्या ऑफिसवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छापेमारी एके – 47, पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.
देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आणि दहशतवादाला पाठिंबा या आरोपांखाली जम्मू काश्मीर स्पेशल टीमने काश्मीर टाइम्स वृत्तपत्राच्या मुख्य कार्यालयावर छापेमारी केली आहे. काश्मीर टाइम्सने काही वेळापासून त्यांची जम्मूमधील प्रिंट आवृत्ती बंद केली आहे. सकाळी 6 वाजता या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली.
कशी झाली कारवाई?
स्पेशल टीमने सकाळी काश्मीर टाइम्सच्या ऑफिसवर छापेमारी केली. काही दिवस आधी या वृत्तपत्राविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा तपास केला जात आहे. विशेष म्हणजे या आधी काश्मीर टाइम्सच्या जम्मू आणि काश्मीरमधील ऑफिसमध्ये देशविरोधी मजकूर प्रदर्शित करण्याच्या कारणामुळे छापेमारी करण्यात आली होती.