उत्तर प्रदेश : मथुरेतील वृदांवन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदीरात (Banke Bihari Temple) जन्माष्टमी उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. भारतासह जगभरातील भाविक आणि पर्यटक येथे दाखल होत असतात. उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये यंदाही श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केला गेला. बांके बिहारी मंदिरात जन्माष्टमीमुळे लाखोंची गर्दी होती. बांके बिहारी मंदिरात पहाटे चार वाजता मंगला आरती केली जाते. जन्माष्टमीवेळी मंगला आरती सुरु असताना चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली. यामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत.