Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार! आठ बॅरिकेड्स तोडून विधानसभा जवळ पोहोचले, पोलिसांचा वॉटर कॅननचा मारा

Jharkhand student protest: झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सोमवारी अधिक तीव्र झाले. विधानसभा घेरावासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांनी पोलिसांचे तब्बल आठ बॅरिकेड्स तोडून विधानसभा दिशेने आगेकूच केली. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 10, 2026 | 02:06 PM
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार! आठ बॅरिकेड्स तोडून विधानसभा जवळ पोहोचले, पोलिसांचा वॉटर कॅननचा मारा

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार! आठ बॅरिकेड्स तोडून विधानसभा जवळ पोहोचले, पोलिसांचा वॉटर कॅननचा मारा

Follow Us
Follow Us:
  • झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार!
  • आठ बॅरिकेड्स तोडून विधानसभा जवळ पोहोचले
  • पोलिसांचा वॉटर कॅननचा मारा
Jharkhand student protest: झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सोमवारी (10 ऑगस्ट 2026 ) अधिक आक्रमक झाले. विधानसभा घेरावासाठी राजधानी रांचीमध्ये जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी पोलिसांनी उभारलेले एकामागून एक बॅरिकेड्स पार केले. अखेर विद्यार्थ्यांनी आठवे बॅरिकेडही तोडून विधानसभा परिसराच्या दिशेने आगेकूच केली.

आठ बॅरिकेड्स तोडून विद्यार्थ्यांची आगेकूच

विद्यार्थ्यांना विधानसभा परिसरापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केली होती. मात्र आंदोलक विद्यार्थ्यांनी एकामागून एक बॅरिकेड्स पार करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. जुन्या विधानसभा परिसराजवळ विद्यार्थ्यांनी पहिला बॅरिकेड तोडल्यानंतर त्यांची आगेकूच सुरूच राहिली. आठवे बॅरिकेड पार केल्यानंतर विद्यार्थ्यांचे गट वेगवेगळ्या दिशेने पुढे सरकले. काही विद्यार्थी विधानसभा दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर पोलिसांकडून त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Jharkhand Protest: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा; रांचीत बॅरिकेडिंग तोडून विधानसभा दिशेने आगेकूच, ७५० मीटर परिसरात जमावबंदी

वॉटर कॅननचा वापर

आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केला. मात्र पाण्याच्या जोरदार फवाऱ्यांनंतरही अनेक विद्यार्थी मागे हटले नाहीत. उलट काही विद्यार्थी वॉटर कॅननच्या पाण्यात उभे राहून घोषणाबाजी करताना आणि झोके घेताना दिसले. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. पोलिस आणि प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना पुढे न जाण्याचे तसेच शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही आंदोलकांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

२४ जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी रांचीत दाखल

या आंदोलनासाठी झारखंडच्या २४ जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा, पोस्टर्स आणि बॅनर्स असून ते विधानसभा दिशेने मार्च करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये १४व्या JPSC पूर्व परीक्षेसह वादग्रस्त परीक्षा रद्द करणे, भरती प्रक्रियेत सुधारणा करणे आणि संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करणे यांचा समावेश आहे.

सरकारसोबतची चर्चा निष्फळ

रविवारी सरकार आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये चर्चेची तिसरी फेरी झाली होती. मात्र ही बैठकही निष्फळ ठरली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विधानसभा घेरावाचा निर्णय जाहीर केला. सोमवारी सकाळपासूनच रांचीच्या विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून विद्यार्थी बस, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून रांचीमध्ये पोहोचले. अनेक विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री जयपाल सिंह मुंडा स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात मुक्काम केला.

भाजपचेही मुख्यमंत्री निवासासमोर आंदोलन

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान भाजपनेही मुख्यमंत्री निवासाच्या घेरावाचे आंदोलन केले. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप आमदारांची बैठक झाल्यानंतर आमदार आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री निवासाकडे रवाना झाले. सुमारे सकाळी ९.४५ वाजता झालेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी बाबूलाल मरांडी, भाजप प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

रांचीत सुरक्षा व्यवस्था कडक

विद्यार्थ्यांचा विधानसभा घेराव आणि भाजपच्या मुख्यमंत्री निवास आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. विधानसभा आणि मुख्यमंत्री निवासाच्या आसपास मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाचा प्रयत्न विद्यार्थ्यांना विधानसभा परिसरापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याचा आहे. मात्र विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असून बॅरिकेड्स पार करत सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे रांचीमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Jharkhand JPSC : परीक्षेच्या वादात मोठी खळबळ; JPSC च्या तीन सदस्यांचा राजीनामा

Web Title: Jharkhand students break eight barricades assembly gherao water cannon ranchi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Jharkhand
  • Ranchi
  • Student Protest

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
1

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
2

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.