Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

IIT Bombay Student Suicide : IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आंदोलन केलं. झीनत शबरीन यांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Sep 21, 2026 | 06:43 PM
साहिल वाकोडे प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचं IIT बॉम्बेच्या बाहेर आंदोलन

साहिल वाकोडे प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचं IIT बॉम्बेच्या बाहेर आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • साहिल वाकोडे प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचं IIT बॉम्बेच्या बाहेर आंदोलन
  • झीनत शबरीन यांनी निष्पक्ष चौकशी आणि प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्यावर कारवाईची मागणी 
  • आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
 

IIT Bombay Student Suicide : मुंबईतील IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी आता राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. साहिलला न्याय मिळावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसने IIT बॉम्बेच्या बाहेर जोरदार आंदोलन केलं. युवक काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बे कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांकडूनही आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी विविध मागण्या मांडल्या असून, त्यात संस्थात्मक उत्तरदायित्व, मानसिक आरोग्य आणि तक्रार निवारण व्यवस्थेत सुधारणा यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. IIT-बॉम्बे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या 18 मागण्यांवर चर्चा केली असून त्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू आहे.

युवक काँग्रेसचा IIT बॉम्बेच्या बाहेर जोरदार मोर्चा

झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. यावेळी साहिल वाकोडेला न्याय मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘जब जब सरकार डरती है, पुलिस को आगे करती है’, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

Harshwardhan Sapkal on Drought: देवेंद्र फडणवीस कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतात?; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

‘साहिलला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही’

झीनत शबरीन यांनी साहिल वाकोडे प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या 18 मागण्यांना युवक काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच IIT बॉम्बेमध्ये जातीय भेदभावाच्या आरोपांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. साहिलच्या कुटुंबीयांनीही जातीय भेदभाव आणि छळाचे आरोप केले आहेत. मात्र, IIT बॉम्बेने यापूर्वी अशा तक्रारी संस्थेकडे करण्यात आल्याचं नाकारलं आहे. त्यामुळे या आरोपांची चौकशी होणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्राध्यापकांवरील कारवाईची मागणी

युवक काँग्रेसने प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शबरीन यांनी त्यांना सेवेतून बरखास्त करण्याची मागणी केली. दरम्यान, दुल्ला यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे आणि IIT बॉम्बेने त्यांचं डीनपद निलंबित केलं आहे. मात्र, विद्यापीठातील फॅकल्टीच्या एका गटाने दुल्ला यांना पाठिंबा देत आरोपांची योग्य चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे.

साहिल वाकोडे प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Bihar Minor Girl Harassment Video: बिहारच्या रस्त्यांवर मुली सुरक्षित का नाहीत? छेडछाडीच्या ‘त्या’ व्हिडीओवरून राहुल गांधी आक्रमक

Web Title: Iit bombay student suicide youth congress protest mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • Congress
  • IIT Bombay
  • Student Protest
  • Student Suicide

संबंधित बातम्या

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
1

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
2

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

IIT Bombay Student Suicide : प्राध्यापकाविरोधात FIR दाखल; वडिलांचा तीन महिन्यांपासून जातीय छळ केल्याचा आरोप
3

IIT Bombay Student Suicide : प्राध्यापकाविरोधात FIR दाखल; वडिलांचा तीन महिन्यांपासून जातीय छळ केल्याचा आरोप

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
4

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.