नवी दिल्ली : भारताला 49 सरन्यायाधीश मिळाले आहे. मराठमोळे न्या. उदय लळीत (CJI Uday Lalit) यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह इतर मंत्रीदेखील उपस्थित होते.
[read_also content=”मुनव्वर फारुकीचा शो रद्द; विश्व हिंदू परिषदेची धमकी https://www.navarashtra.com/india/munawwar-farooquis-show-cancelled-threat-of-vishwa-hindu-parishad-nrgm-319749.html”]
नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह इतर महत्त्वांच्या प्रकरणांवर निकाल येणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.