पत्नीला २ सरकारी नोकऱ्या, स्वतः बनला प्राध्यापक; राजकीय नेत्याचा प्रताप
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात एक फसवणुकीचं प्रकरण समोर आलं असून राजकारणात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला एकाच वेळी दोन सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. इतकेच नाही तर त्याने स्वतःला एका कॉलेजमध्ये चुकीच्या पद्धतीने नियुक्ती मिळवली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Ulahasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये गुंडांचा धुमाकूळ; वाहनांची तोडफोड, नागरिकांवर हल्ला
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. भास्कर अवस्थी यांना कानपूर देहात पोलिसांनी एका महाविद्यालयाशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. अवस्थी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संचालक असलेले डॉ. अवस्थी यांना पोलिसांनी जालौन येथील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं.
कॉलेज व्यवस्थापनाने सांगितलं की, भास्कर अवस्थी यांनी इथे कधीही काम केलेलं नाही. त्यांच्या पत्नीने एकदा मुलाखत दिली होती, पण कधीही सेवा केली नाही. राजकीय वैमनस्यातून त्यांना अडकवण्यात आल्याचं अवस्थी यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्षात, जालौन येथील एका व्यक्तीने गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी एसटीएफच्या एडीजीला पत्राद्वारे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली होती. या आधारे, गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोणावळा खंडाळा परिसरात चोरीच्या घटनेत वाढ; लाखोंचा ऐवज लंपास, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
आरोपीला सोमवारी चौकशीसाठी ओराई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. भास्करविरुद्ध पुरेसे पुरावे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सध्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीच्या पत्नीच्या दुसऱ्या नोकरीच्या बाबतीतही कारवाई करता येईल.