Increase In Theft And Burglary Incidents In Lonavala Khandala Area Pune Crime News
लोणावळा खंडाळा परिसरात चोरीच्या घटनेत वाढ; लाखोंचा ऐवज लंपास, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुण्यातील लोणावळा व खंडाळा परिसरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. जुजी कॉलनी येथील एका बंगल्यात भरदिवसा चोरीची घटना घडली असून लाखो रुपयांचा ऐवज चोरला.
लोणावळामध्ये घरफोडी करुन लाखोंचा ऐवज चोरीला गेला असल्याची घटना (फोटो सौजन्य - iStock)
Follow Us:
Follow Us:
वडगाव मावळ : लोणावळा खंडाळा परिसरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. खंडाळा परिसरातील राजुजी कॉलनी येथील एका बंगल्यात भरदिवसा चोरीची घटना घडली. या घरफोडीमध्ये अज्ञात चोरट्याने तब्बल 26 लाख 26 हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. ही चोरीची घटना 09 जून 2025 रोजी सकाळी उघडकीस आली.
वीणा नारायण मुळे (वय ६५ वर्षे, रा. भवानीप्रसाद बंगला, राजुजी कॉलनी, घुगळे बँक हाऊस शेजारी, जुना खंडाळा, लोणावळा) यांनी याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, फिर्यादींच्या बंगला परिसरातील मुख्य गेट व दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान दागिने लंपास केले.
खंडाळामध्ये घडलेल्या या घरफोडी आणि चोरीच्या घटनेमध्ये चोराने लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये
१२ तोळ्यांच्या ६८ ग्रॅंमच्याा सोन्याच्या बांगड्या (मूल्य – ₹७,२०,०००) ८ तोळ्यांच्या ६४ ग्रॅंमच्या सोन्याच्या पाटल्या (मूल्य –
₹४,८०,०००), ५ तोळ्यांच्या २ सोन्याच्या साखळ्या (मूल्य ₹३,००,०००), १० तोळ्यांचे दोन शिंदेशाही तोडे (मूल्य ₹६,००,०००) १.५ तोळ्याची सोन्याची अंगठी (मूल्य ₹९०,०००), ६ ग्रॅमचे ३ सोन्याचे कानातले जोड (मूल्य ₹३६,०००), ८.९ तोळ्यांचे दोन सोन्याचे नेकलेस (मूल्य ₹५,४०,०००), १ तोळ्याच्या ४ सोन्याच्या बांगड्या (मूल्य ₹६०,०००) तसेच २ किलो चांदीचे भांडे व पूजावस्तू (मूल्य ₹१,००,०००) चोरले होते. या चोरीमध्ये एकूण चोरी गेलेला ऐवज २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.
ही घटना ९ जून रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी घडली असावी, अशी पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. सदर गुन्ह्याची नोंद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे. खंडाळा परिसरात पूर्वीही अशा प्रकारच्या घरफोडीच्या घटना घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
कराडमध्ये AIच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ
साताऱ्यातील कराडमधून धक्कदायक प्रकार समोर आला आहे. दोन नामांकित डॉक्टर महिलांचे AIच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार स्वत:ला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं असून, पोलिसांकडून तपास सुरु आहे. हे व्हीडीओ परराज्यातून तयार करण्यात आले असून, ते बनावट असल्याचे आणि एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत अश्लील चाळे करत असल्याचे दाखवण्यात आले. हे प्रकार सोशल मीडियावर वायरल होऊ नयेत म्हणून पीडित डॉक्टरांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
Web Title: Increase in theft and burglary incidents in lonavala khandala area pune crime news