उल्हासनगरमध्ये गुंडांचा धुमाकूळ; वाहनांची तोडफोड, नागरिकांवर हल्ला
Ulahasnagar Crime News : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील आशेले पाडा परिसरात ७ ते ८ गुंडांच्या टोळीने अचानक हल्ला केला. त्यामुळए संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. या सशस्त्र टोळीने रस्त्यावर उभ्या असलेल्या २५ ते ३० वाहनांना तोडफोड केली. हल्लेखोरांनी केवळ वाहनांचे नुकसान केले नाही तर तेथून जाणाऱ्या महिला, मुले आणि पुरुषांवरही तलवारी आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला केला. या हिंसक हल्ल्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा हल्ला अचानक झाल्याने एकच खळूळ उडाली होती. ही टोळी परिसरात प्रवेश करताच त्यांनी कोणतेही कारण नसताना लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्यांचे शस्त्रे घटनास्थळीच सोडून पळ काढला.
Sangli Politics: चंद्रहार पाटलांसाठी राऊतांनी शिवसेनेची वाट लावली; सांगलीतील पदाधिकाऱ्यांचा संता
या हल्ल्यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींनी केलेला हल्ला परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.
Ulhasnagar, Maharashtra: In the case of the attack in Ashale Gaon, a case has been registered against four individuals, two of whom have been arrested. The police are conducting searches at various locations to apprehend the remaining suspects. DCP Sachin Gore spoke on the matter pic.twitter.com/LKTS0glfub
— IANS (@ians_india) June 11, 2025
या हल्ल्यामागील हेतू काय होता हे सध्या स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणावर बोलताना डीसीपी सचिन गोरे म्हणाले की, आशाळे गावात झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांना पकडण्यासाठी पोलिस विविध ठिकाणी छापे टाकत हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
बच्चू कडूंना मिळाले मराठा समाजाचे पाठबळ? मनोज जरांगे पाटील उपोषणस्थळी दाखल