Sabrimala Temple Gold Missing: शबरीमाला मंदिरातील कोटींचे सोने गायब? सगळीकडे खळबळ; HC ने थेट....
केरळमधील शबरीमाला मंदिर आहे जगप्रसिद्ध
केरळ हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश
साडे-चार किलो सोने गायब झाल्याचा संशय
Kerala High Court: केरळच्या शबरीमाला मंदिराबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या जगप्रसिद्ध असणाऱ्या शबरीमाला मंदिरातून कोट्यवधींचे सोने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत केरळ हायकोर्टाने तपासणीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
शबरीमाला हे केरळमध्ये असणार प्रसिद्ध मंदिर आहे. जगभरात त्याची ख्याती आहे. हे एक जागृत देवस्थान असल्याची भक्तांची भावना आहे. मात्र आता याच मंदिराबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या मंदिरातील सोने गायब झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान केरळ हायकोर्टाने देखील याची गंभीर दखल घेतली आहे.
नेमके प्रकरण काय?
शबरीमाला मंदिरातील सोने अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ हायकोर्टाने याची गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत. सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २०१९ मध्ये शबरीमाला मंदिरात सोन्याचा मुलामा काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळेस ४२ किलो सोने मंदिरातून नेण्यात आले होते.
४२ किलो सोन्याच्या मदतीने सोन्याचा मुलामा मंदिरात केला जाणार होता. काम जल्यावरट्या सोन्याच्या प्लेट पुन्हा गर्भगृहात लावल्या जाणार होत्या. मात्र या प्लेट्सचे वजन केल्यानंतर केवळ ३८ किलो सोने मुलामा देण्यासाठी वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. उरलेले सोने गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता हे गायब झालेले सोने कुठे गेले याचा तपास करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे.
शबरीमलाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बस आणि ऑटोमध्ये धडक; 5 जणांचा मृत्यू!
रुक्मिणी मातेच्या पुरातन अलंकारांना मिळणार नवी झळाळी
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहेत, असे अलंकार उत्सवाप्रसंगी श्रींस परिधान करण्यात येतात. नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार,चपलाहार, पेटय़ांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, शिंदे हार, जवाच्या माळा आणि हायकोल सुर्य-चंद्र असे दागिने आहेत. हिऱ्यांचे खोड असलेला तन्मणी, तारामंडल असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत.