केरळमधून रस्ते अपघाताची मोठी (accident in kerala) बातमी समोर येत आहे. केरमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात (sabarimala temple ) दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मलप्पुरममधील मंजेरी टाऊन येथे शुक्रवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या ऑटो रिक्षाची बसला समोरासमोर धडक झाडली. मृतकांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.
[read_also content=”मुंबईकराची कमाल, वर्षभरात स्विगीवरुन 42.3 लाखाचं फूड ऑर्डर; तर ‘या’ खाद्यपदार्थाची होती सर्वाधिक मागणी! https://www.navarashtra.com/india/a-user-from-swiggy-ordered-online-food-of-rs-42-3-lakh-nrps-489024.html”]
नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान शबरीमलामध्ये मोठी यात्रा भरते. देशभरातुन भाविक मोठ्या प्रमाणावर येथे येतातत. मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या मल्लपुरममधुन काही भाविक शबरीमला मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येताना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांनी भरलेल्या ऑटोची बसला जोरदार धडक बसली. यामुळे ऑटो पलटी होऊन अपघात झाला. या अपघाता पाच जणांचा मृत्यू झाला. अपघातात ठार झालेल्यांची ओळख पटली आहे. यामध्ये साबिरा, मोहम्मद निशाद, आशा फातिमा, मोहम्मद असन आणि रेहान यांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांला कोझिकोड येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे मलप्पुरम पोलिसांनी सांगितले.
मलप्पुरम जिल्हा पोलीस प्रमुख म्हणाले की, या घटनेसाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली असून त्यात पोलीस आणि मोटार वाहन विभागातील लोकांचा समावेश आहे. अपघातस्थळाचीही तपासणी केली जाणार असून रस्त्याची स्थितीही पाहिली जाणार आहे. मांजरी पोलिसांनी सध्या बस चालकाला ताब्यात घेतले आहे. ही बस शबरीमलाहून प्रवाशांना घेऊन परतत होती, असे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर शबरीमला येथून सुटणाऱ्या बसेसच्या स्थितीचीही तपासणी केली जाईल जेणेकरून सत्यता कळू शकेल.