वारीस पंजाब दे संघटनेचा (Waris Punjab De chief Amritpal Singh) प्रमुख खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Waris Punjab De chief Amritpal Singh)) यांची प्रक्षोभक वक्तव्यं काही थांबताना दिसत नाहीत. पोलीस प्रशासन आणि पंजाब सरकारला आव्हान दिल्यानंतर त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना धमकी देऊन खळबळ उडवुन दिल्यानतंरही त्याला स्वस्थ बसवत नाही आहे. अमृतसरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृतपाल म्हणाला की, ‘हिंसा ही पवित्र गोष्ट आहे आणि स्वातंत्र्यापूर्वी भारत नव्हता. मला भारताची व्याख्या मान्य नाही आणि पंजाब हा वेगळा देश आहे’. त्याच्या या वक्तव्याने वातावरण अजुन बिघडण्याची शक्यता आहे.
[read_also content=”एका वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्स, 6300 रणगाडे, 300 लढाऊ विमानं उद्ध्वस्त! पुतिनला खुुप महागात पडलं युक्रेनशी युद्ध करणं https://www.navarashtra.com/world/9-trillion-dollars-6300-tanks-300-fighter-planes-destroyed-in-one-year-nrps-371960.html”]
अमृतपाल वारिस पंजाब दे संघटनेचा अध्यक्ष अमृतपाल सिंहने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हण्टलं की, ‘हिंसा ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. १९४७ पूर्वी भारत नव्हता. भारत राज्यांचा संघ आहे (भारत राज्यांचा संघ आहे). भारताची व्याख्या मला मान्य नाही. पंजाब हा एक वेगळा प्रकार आहे. पंजाबमध्ये वेगळी ऊर्जा आहे. पंजाब हा वेगळा देश आहे. शिखांनी भारतासाठी अनेक बलिदान दिल्याचे अमृतपाल यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘शिखांनी देशासाठी प्राण दिले पण त्या बदल्यात त्यांना काय मिळाले. 1984 चा नरसंहार. एका राज्याचे तीन तुकडे. 1984 चा नरसंहार. एका राज्याचे तीन तुकडे. 1984 मध्ये एअर मार्शल अर्जुन सिंह यांच्या घरी जमावाने पोहोचून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याच्या हातातील शस्त्र हिसकावले होते.1984 मध्ये एअर मार्शल अर्जुन सिंह यांच्या घरी जमावाने पोहोचून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याच्या हातातील शस्त्र हिसकावले होते.
ज्या अमृतपालच्या नावाने सगळा गोंधळ सुरु आहे ते त्याने नेमकं काय केलं ते जाणुन घ्या. अमृतपालचा समर्थक लवप्रीत तुफानवर बरिंदर सिंग यांचे अपहरण आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अमृतपाल आणि त्यांच्या समर्थकांनी अजनाळा पोलिस ठाण्याचा ताबा घेतला. यावेळी समर्थकांच्या हातात बंदुका, तलवारी, काठ्या होत्या घेत पोलिस स्टेशनमध्ये चांगलाच गोंधळ घातला. सुमारे आठ तास चाललेल्या गोंधळानंतर पोलिसांनी लवप्रीत तुफानला सोडण्यास तयार झाल्यानंतर आंदोलन थोड शांत झाला.