Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

Former IG Amar Singh Chahal Suicide Attempt: पंजाब पोलिसांचे माजी पोलीस महानिरीक्षक अमर सिंह चहल हे त्यांच्या राहत्या घरात गंभीर अवस्थेत सापडले असून त्यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्यातची माहिती समोर

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 02, 2026 | 12:23 PM
मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी पोलीस महानिरीक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
  • सायबर फसवणूक प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
  • रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू
विजय काते, भाईंदर : ज्येष्ठ भारतीय पोलीस प्रशासनातील माजी सेवानिवृत्त अधिकारी अमर सिंह चहल यांनी आत्महत्येच्या उद्देशाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना समोर आली असून, सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उघडकीस आलेल्या सायबर फसवणूक प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात मिरा-भाईंदर येथील भाजप पदाधिकारी शेरा ठाकूर आणि त्याच्या इतर साथीदारांनी मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात तपासासाठी पंजाब पोलीस नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, चौकशीअंती काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात शेरा ठाकूर व संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम वळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.

मॉर्निंग वॉकचा ‘तो’ दिवस ठरला अखेरचा; ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

याच प्रकरणात शेरा ठाकूरचा एक साथीदार ताब्यात घेण्यात आला असून, पूर्वी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला ‘पांडे’ नावाचा बुकीही या टोळीचा भाग असल्याची माहिती समोर येत आहे. पांडे हा सट्टेबाजी प्रकरणात यापूर्वीही संशयित राहिलेला असून, त्याचा या सायबर फसवणूक प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा संशय आहे.

दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरात काही व्यक्ती क्रिकेट सट्टा व अन्य बेकायदेशीर सट्टेबाजी चालवत असल्याचीही माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकरणांचा सखोल तपास झाल्यास आणखी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांकडून आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि डिजिटल पुरावे यांचा सखोल छडा लावला जात असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “असे अपराधी जर मिरा-भाईंदर शहरात राहत असतील तर त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशा लोकांमुळे शहराचं नाव खराब होतं. तसेच जे राजकीय नेते व कार्यकर्ते त्यांच्या सोबत फिरतात, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी स्पष्ट मागणी सरनाईक यांनी केली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार अमर सिंह चहल यांनी सोमवारी पटियाला येथील त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच कुटुंबातील सदस्यांनी धाव घेतली आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

‘प्रायव्हेट पार्ट दाखवला, लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले’, मुख्याध्यापकांची महिलेकडे अश्लील मागणी, सरकारी शाळेत लज्जास्पद प्रकार

 

Web Title: Ex igp amar singh chahal one of the accused in 2015 kotkapura police firing case shoots self with rifle of his gunmen critical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Punjab

संबंधित बातम्या

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
1

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

‘प्रायव्हेट पार्ट दाखवला, लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले’, मुख्याध्यापकांची महिलेकडे अश्लील मागणी, सरकारी शाळेत लज्जास्पद प्रकार
2

‘प्रायव्हेट पार्ट दाखवला, लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले’, मुख्याध्यापकांची महिलेकडे अश्लील मागणी, सरकारी शाळेत लज्जास्पद प्रकार

ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी, समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात
3

ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी, समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना
4

Chandrapur Accident: वाहनाच्या धडकेत सलून चालकाचा मृत्यू, कार चालकाचे कुटुंब जखमी; धानोरा पॉईंटवरील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.