भारतात किती वाजता असेल चंद्रग्रहण? 'या' वेळी असेल सूतक काळ
नवी दिल्ली : भारतात आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, लखनौ या ठिकाणी दिसणार आहे. येथील लोकांना ते पाहताही येणार आहे. पण, या चंद्रग्रहणादरम्यान काही विशेष खबरदारी घेणेही गरजेचे असते.
भारतात जिथे-जिथे ग्रहण दिसेल, तिथे चंद्रग्रहणाशी संबंधित सर्व पारंपारिक विधी लागू असणार आहेत. चंद्रग्रहणादरम्यान अनेक खबरदारी घेणे योग्य ठरते. या काळात अन्न न खाणे, पूजा आणि इतर शुभ कार्ये देखील प्रतिबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. 2025 चे हे पूर्ण चंद्रग्रहण रविवारी रात्री 9.58 सुमारास सुरु होईल, जे मध्यरात्री 1.26 च्या सुमारास संपेल. या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे, रविवारी सर्व लहान आणि मोठ्या शहरांमधील प्रमुख मंदिरांचे दरवाजे बंद केले जातील आणि सोमवारी सकाळी शुद्धीकरणानंतर भाविकांच्या पूजेसाठी पुन्हा उघडले जातील.
या चंद्रग्रहणातील सूतक काळ नऊ तास आधी अर्थात दुपारी १२:५७ ला सुरू होईल. या ग्रहणाचा सूतक काळ नऊ तास आधीपासून प्रभावी होईल. म्हणजेच, रविवारी दुपारपासून अन्न, मूर्तीपूजा आणि धार्मिक विधींवर बंदी असेल. फक्त मुले, आजारी आणि वृद्धांना सूतक काळापासून सूट देण्यात आली आहे.
वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण रविवारी होत आहे. जे भारतात रात्री ९:५८ ते पहाटे १:२६ पर्यंत पूर्णपणे दिसेल. या दिवसापासून पितृपक्ष देखील सुरू होत आहे, ज्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व आणखी वाढते. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने, सुतक काळ प्रभावी राहील. चंद्रग्रहण केवळ खगोलीय घटना म्हणूनच नव्हे तर धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे मानले जाते.
2025 चे चंद्रग्रहण कधी सुरू होईल आणि कधी संपेल?
चंद्रग्रहणाची सुरुवात : रात्री ९:५७
पूर्ण ग्रहणाची सुरुवात: रात्री ११:०१
ग्रहणाचा मध्यकाळ: रात्री ११:४२
एकूण ग्रहण संपेल : मध्यरात्री १:२३
चंद्रग्रहणाची समाप्ती: मध्यरात्री १:२६