कोलकाता: स्टाग्रामवरील एका वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेत आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोलीला कोलकता पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली होती. त्यानंतर शर्मिष्ठा पानोलीने जामीनासाठी कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केला होता. मात्र हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिला आहे.
शर्मिष्ठा पानोलीला जामीन देण्यास नकार देत कोर्टाने गार्डन रिच पोलिस ठाण्याच्या क्षेत्राबाहेरील सर्व याचिकांवर स्थगिती देण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची केस डायरी दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. शर्मिष्ठा पानोलीला जामीन मिळणार की नाही हे आता ५ जून रोजी स्पष्ट होणार आहे.
कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा पानोलीला गुरुग्राममधून अटक केली होती. शर्मिष्ठा पानोलीने एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर इस्लाम आणि पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद असा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याबद्दल तिला अटक करण्यात आली होती.
कोलकाता हायकोर्ट काय म्हणाले?
आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात कोलकाता हायकोर्टाने शर्मिष्ठा पानोलीला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. पुढील सुनावणीत हायकोर्टाने केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. “आपल्या देशातील एका वर्गाच्या भावना दुखावल्या गेलया आहेत. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे याचा अर्थ आपण दुसऱ्यांच्या भावना दुखावल्या पाहिजेत असा होत नाही. आपला देश विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे आपण सावधान राहिले पाहिजे, असे हायकोर्टाने सुनावणीदरम्यान म्हटले.
शर्मिष्ठा सध्या पुणे लॉ युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत. शर्मिष्ठा पनौलीचे एक्स आणि इंस्टाग्रामवर तब्ब्ल १.७५ लाख फॉलोअर्स आहेत. शर्मिष्ठाने ऑपरेशन सिंदूरबाबत बॉलिवूड स्टार्स शांत का आहेत असा प्रश्न उपस्थित करत टीक केली होती. इतकेच नव्हे तर व्हिडीओमध्ये तिने एका समुदायाबाबत आक्षेपार्ह भाषाही वापल्याचा तिच्यावर आरोप आहे. पण तिच्या या पोस्टनंतर वाद वाढल्यामुळे तिने तो व्हिडीओ डिलीट करत सर्वांची जाहीर माफीही मागितली. पण त्यानंतरही कोलकातामध्ये तिच्याविरोदात एफआयआर दाखल करण्यात आली. या एफआयआरमध्ये तिच्यावर धार्मिक द्वेष परसरवणे, धार्मिक भावना भडकावणे आणि शांतता भंग कऱण्याच्या उद्देशाने अपमान करणे, असे आरोप कऱण्यात आले आहेत.
दुसरीकडे, शर्मिष्ठा पनौलीला आता युरोपमधून पाठिंबा मिळत आहे. नेदरलँड्स (डच) संसद सदस्य गीर्ट वाइल्डर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शर्मिष्ठाच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे आणि तिच्या अटकेला ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील डाग’ असल्याचेही म्हटले आहे. गीर्ट वाइल्डर्स यांनी ट्विटर एक्सवर पोस्ट करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे. ‘सर्वांच्या नजरा शर्मिष्ठावर’ असे लिहिलेले पोस्टर पोस्ट करत त्यांनी ‘शूर शर्मिष्ठा पनौलीला सोडा!’ तिला अटक करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लाजिरवाणे आहे. पाकिस्तानबद्दल सत्य बोलल्याबद्दल तिला शिक्षा करू नका. तिला मदत करा,’ असे आवाहन तिने केलं आहे.