इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोलीला अटक
Sharmishtha Panoli News: इंस्टाग्रामवरील एका वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेत आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोलीला कोलकता पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली.कोलकाता पोलिसांनी हरियाणातील गुरुग्राम येथून तिला अटक करून अलीपूर न्यायालयात हजर केले. कोर्टातून बाहेर पडताना शर्मिष्ठा माध्यमांना प्रतिक्रीया देत, ‘लोकशाहीत ज्या पद्धतीने हा अत्याचार केला जात आहे, ती लोकशाही नाही.” अशी टीकाही केली आहे
शर्मिष्ठा ने ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर बॉलिवूड कलाकारांच्या मौनाबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओवर विविध स्तरांतून तीव्र विरोध होऊ लागला. काहींनी तक्रारी दाखल केल्यानंतर कोलकाता पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानंतर शर्मिष्ठा व तिच्या कुटुंबीयांना नोटीस पाठवण्यात आली. मात्र, ते फरार झाल्यामुळे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले.वाद वाढू लागल्यानंतर शर्मिष्ठाने तिचा व्हिडिओ डिलीट करत सोशल मीडियावर माफीही मागितली. पण त्यानंतरही तिच्या विरोधात चौकशी सुरूच आहे. या प्रकरणावर भाष्य करताना शर्मिष्ठा म्हणाली, “मी फक्त देशाच्या हितासाठी बोलले, पण मला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या दिल्या जात आहेत.”
Chandrapur crime news: क्रुरतेचा कळस; गर्भवती महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बाळाचा गर्भातच मृत्यू
शर्मिष्ठा सध्या पुणे लॉ युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत. शर्मिष्ठा पनौलीचे एक्स आणि इंस्टाग्रामवर तब्ब्ल १.७५ लाख फॉलोअर्स आहेत. शर्मिष्ठाने ऑपरेशन सिंदूरबाबत बॉलिवूड स्टार्स शांत का आहेत असा प्रश्न उपस्थित करत टीक केली होती. इतकेच नव्हे तर व्हिडीओमध्ये तिने एका समुदायाबाबत आक्षेपार्ह भाषाही वापल्याचा तिच्यावर आरोप आहे. पण तिच्या या पोस्टनंतर वाद वाढल्यामुळे तिने तो व्हिडीओ डिलीट करत सर्वांची जाहीर माफीही मागितली. पण त्यानंतरही कोलकातामध्ये तिच्याविरोदात एफआयआर दाखल करण्यात आली. या एफआयआरमध्ये तिच्यावर धार्मिक द्वेष परसरवणे, धार्मिक भावना भडकावणे आणि शांतता भंग कऱण्याच्या उद्देशाने अपमान करणे, असे आरोप कऱण्यात आले आहेत.
दुसरीकडे, शर्मिष्ठा पनौलीला आता युरोपमधून पाठिंबा मिळत आहे. नेदरलँड्स (डच) संसद सदस्य गीर्ट वाइल्डर्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शर्मिष्ठाच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे आणि तिच्या अटकेला ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील डाग’ असल्याचेही म्हटले आहे. गीर्ट वाइल्डर्स यांनी ट्विटर एक्सवर पोस्ट करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे. ‘सर्वांच्या नजरा शर्मिष्ठावर’ असे लिहिलेले पोस्टर पोस्ट करत त्यांनी ‘शूर शर्मिष्ठा पनौलीला सोडा!’ तिला अटक करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लाजिरवाणे आहे. पाकिस्तानबद्दल सत्य बोलल्याबद्दल तिला शिक्षा करू नका. तिला मदत करा,’ असे आवाहन तिने केलं आहे.
Nirjala Ekadashi: भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, धनाचा होईल वर्षाव
गुरुग्राम पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोलीने ‘ऑपरेशन सिंदूर’वरून बॉलिवूड कलाकारांच्या मौनावर प्रश्न उपस्थित करत एक वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तिने म्हटले होते की, “बॉलिवूडमध्ये ३-४ असे कलाकार आहेत, जे चित्रपटांमध्ये देशासाठी प्राण देण्याची भाषा करतात. पण जेव्हा खऱ्या अर्थाने देशासाठी उभं राहण्याची वेळ आली, तेव्हा ते पूर्णपणे शांत राहिले. हे लोक मोठे ढोंगी आहेत आणि त्यांना लाज वाटली पाहिजे.”
हा व्हिडिओ १४ मे २०२५ रोजी पोस्ट करण्यात आला होता. त्याच दिवशी शर्मिष्ठा आणि एका पाकिस्तानी फॉलोअरमध्ये सोशल मीडियावर वाद झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शर्मिष्ठाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून त्यापैकी एक पाकिस्तानमधील वापरकर्ता आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या पाकिस्तानी युजरने शर्मिष्ठाला प्रश्न विचारला आणि दहशतवाद्यांचे समर्थन करताना २४ लोकांच्या हत्येचे समर्थन केले.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शर्मिष्ठा पानोलीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात एका विशिष्ट धर्मावर भाष्य करण्यात आले होते. व्हिडिओ पोस्ट होताच, संबंधित धर्मीय समुदायातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. भारत आणि पाकिस्तानातील अनेक मुस्लिम युजर्सनी एकत्र येत तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. त्याचबरोबर शर्मिष्ठाला बलात्कार आणि शिरच्छेद करण्याच्या धमक्याही मिळू लागल्या. या धमक्यांचे स्क्रीनशॉट तिने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आपल्यावर होणाऱ्या दबावाची माहिती दिली. या वादामुळे तणाव वाढला असून पोलिस यंत्रणा चौकशी करत आहे.