Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalu Prasad Yadav News: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात भरती

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लालूंवर अँजिओप्लास्टी झाली होती. डॉक्टरांनी लालू यादव यांच्यावर मुंबईत उपचार केले होते. कारागृहात शिक्षा भोगत असताना लालू यादव यांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान झाले होते

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 02, 2025 | 05:14 PM
Lalu Prasad Yadav News: लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात भरती
Follow Us
Close
Follow Us:

बिहार:  राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. रक्तातील साखर वाढल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना पाटण्यातील राबडी निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना एअर इंडियाच्या विमानाने  दिल्लीला नेण्यात येणार होते. राबडी देवी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रीय जनता दल (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गेल्या दोन दिवसांपासून बिघडलेली होती, मात्र आज ती आणखी खालावली. त्यांचा एक नवीन फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते बेडवर झोपलेले असून ऑक्सिजन मास्क घातलेले दिसत आहेत. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी पसरताच, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या १०, सर्कुलर रोड येथील सरकारी निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर मीडिया आणि लोकांची गर्दी झाली आहे.

Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावरून अरविंद सावंतांनी मांडली पक्षाची भूमिका; म्हणाले, “… त्याचे समर्थन करणार नाही”

दीर्घ काळापासून आरोग्याच्या समस्या 

लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांत अनेक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे गेले आहेत. २०२२ मध्ये त्यांना किडनीचा आजार असल्याचे निदान झाले होते. त्यांची केवळ २५% मूत्रपिंडे कार्यरत होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या मुलीने, राहिनी आचार्य यांनी, त्यांना आपली एक किडनी दान केली. ५ डिसेंबर २०२२ रोजी सिंगापूरमध्ये त्यांचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पार पडले.

त्याच वर्षी, त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या घरी ते अपघाताने पडले, ज्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले. त्यानंतर, त्यांच्यावर पाटण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने, त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले.

BJP President: ‘या’ तारखेला भाजपला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? भाजपची घटना काय सांगते? कोणाची नावे चर्चेत

हृदयविकाराचा त्रास आणि अँजिओप्लास्टी

लालू यादव यांना २०२१ मध्ये हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. रांचीच्या बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विशेष उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. २०२३ मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

बिहार विधानसभा निवडणुका

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कदाचित हा पहिलाच प्रसंग असेल, जिथे लालू यादव घरगुती आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढत आहेत.  RJD च्या राजकारणात लालू यादव यांच्या नेतृत्वातील सत्ता १९९० ते २००५ या कालावधीत पाहायला मिळाली. मात्र, २०२० मध्ये RJD ची राजकीय दिशा पूर्णतः वेगळी आणि नव्या विचारसरणीसह समोर आली. त्या वेळी लालू यादव निवडणुकीच्या मैदानातून पूर्णतः बाहेर होते.

गोंधळाच्या राजकारणाचे मास्टरमाइंड – लालू यादव

सामाजिक न्यायासाठी ओळखले जाणारे लालू यादव हे गोंधळाच्या (कन्फ्यूजन) राजकारणाचेही तज्ज्ञ खेळाडू मानले जातात. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या रणनीतीचे उत्तम उदाहरण दाखवले. त्या निवडणुकीत भाजपला मोठ्या विजयाची अपेक्षा होती, मात्र तेव्हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या पुनरावलोकनाची गरज असल्याचे वक्तव्य केले. लालू यादव यांनी त्याच वक्तव्याला एक प्रभावी प्रचारहत्यार बनवले  “जर भाजप सत्तेत आली, तर आरक्षण संपुष्टात येईल.” असा प्रचाक कऱण्यात आला.  याच रणनीतीमुळे लालू यादव यांनी २०१५ मध्ये भाजपला मोठा फटका दिला आणि स्वतःची राजकीय ताकद पुन्हा सिद्ध केली.

Web Title: Lalu prasad yadavs health deteriorated admission to hospital nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Lalu Prasad yadav

संबंधित बातम्या

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार
1

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार

Tej Pratap Yadav:  मोठी बातमी! राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात मोठी फूट पडणार
2

Tej Pratap Yadav: मोठी बातमी! राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात मोठी फूट पडणार

Tej Pratap Yadav : ‘माझ्या चारी बाजूंनी शत्रू, माझ्या जिवाला धोका’; तेज प्रताप यांच्या दाव्याने बिहारमध्ये खळबळ
3

Tej Pratap Yadav : ‘माझ्या चारी बाजूंनी शत्रू, माझ्या जिवाला धोका’; तेज प्रताप यांच्या दाव्याने बिहारमध्ये खळबळ

Bihar Election : लालूंच्या राजवटीत CM हाऊसमधून खंडणीची ‘डील’; भाजपा नेते गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल
4

Bihar Election : लालूंच्या राजवटीत CM हाऊसमधून खंडणीची ‘डील’; भाजपा नेते गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.