Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Terrorist Latif Bhat Encounter: लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर लतीफ भटचा खात्मा; जंगलपोरामध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Latif Bhat Encounter: १६ नोव्हेंबर रोजी कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आणि दुसरा अडकल्याचे वृत्त आहे. ही कारवाई जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी केली.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 18, 2026 | 11:13 AM
Kulgam Encounter Latif Bhat, Lashkar e Taiba Commander Killed Kulgam

Kulgam Encounter Latif Bhat, Lashkar e Taiba Commander Killed Kulgam

Follow Us
Follow Us:
  • जम्मू-काश्मीरमधील जंगलपोरा येथे सुरक्षा दलांची यशस्वी दहशतवादविरोधी कारवाई
  • लष्कर-ए-तोयबाचा (LeT) उच्च कमांडर लतीफ भट याचा चकमकीत खात्मा
  • मशिदीत लपून बसलेल्या लतीफ भटला पोलीस आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने केले ठार
Terrorist Latif Bhat Encounter: जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांनी मोठी मोहीम फत्ते केली आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दहशतवादी लतीफ भटचा खात्मा केला आहे. विश्वसनीय गुप्त माहितीच्या आधारे, कुलगाम जिल्ह्यातील जंगलपोरा येथे पोलिसांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत मशिदीत लपून बसलेल्या लतीफ भटला ठार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट अडकला

पोलिसांच्या सूत्रांनुसार, लष्कर-ए-तोयबाचा (LeT) एक उच्च कमांडर लतीफ भट आणि त्याचे काही साथीदार लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यावर कुलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर  लतीफचा शोध वेगाने सुरू झाला होता. अशातच सुरक्षा दलांना  लतीफ भट तो एका मशिदीत लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सुरक्षा दल आणि पोलिसांनी परिसरात शोधमोहिम सुरू केली.

IND vs NZ Test: शुभमनचा प्लान तयार! ODI पेक्षा वेगळाच संघ उतरणार मैदानात, बुम बुम बुमराहचाही जलवा

कुलगाममध्ये नुकताच एक दहशतवादी ठार

१६ नोव्हेंबर रोजी कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आणि दुसरा अडकल्याचे वृत्त आहे. ही कारवाई जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी केली.

VIDEO | Jammu and Kashmir: Security beefed up in Kulgam, intense checking by security forces Top LeT terrorist Lateef Bhat has been killed in encounter with security forces in Kulgam. #KulgamEncounter #JammuAndKashmir (Visuals deferred by unspecified time) (Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTfmBd) — Press Trust of India (@PTI_News) November 18, 2026

पोलिस आणि सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातल्यानंतर त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या, परंतु त्याने नकार दिला. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. मशिदीतून बाहेर येताच त्याला गोळ्या घालण्यात आल्या.

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त; सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

कुलगामचे एसएसपी अनायत अली यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लतीफ भटशी एका दीर्घ व्हिडिओ कॉलवर वैयक्तिकरित्या संवाद साधला आणि त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्नही केला. आत्मसमर्पण केल्यास त्याचा जीव वाचवला जाईल, असे आश्वासन त्याला देण्यात आले होते. मात्र, लतीफने ही ऑफर नाकारली.

एसएसपींच्या म्हणण्यानुसार, लतीफ पहाटे २:४५ च्या सुमारास मशिदीत घुसला आणि त्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला बाहेर काढण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. सुरक्षा यंत्रणांनी धार्मिक स्थळाचे नुकसान होऊ नये यासाठी अत्यंत काळजी घेतली आणि सुरक्षा दलांनी मशिदीच्या आत कोणतीही कारवाई केली नाही.

एसएसपींनी सांगितले की, लतीफ भट १८ नोव्हेंबर २०२५ रोजी लश्कर-ए-तोयबामध्ये सामील झाला होता. त्याने कथितरित्या स्वतःला कट्टरपंथी बनवले होते आणि जम्मू आणि काश्मीरमधील शांतता, पर्यटन आणि अर्थव्यवस्था विस्कळीत करण्यासाठी त्याला सीमेपलीकडून सूचना मिळत होत्या.

Indian Airlines : भारतात विमान प्रवासाचा वेग वाढणार! एअरलाईन्स आणखी 1,000 विमाने खरेदी करणार; पीयूष गोयल यांची मोठी माहिती

कुलगाम हल्ल्याचा सूत्रधार

कुलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लतीफ भट होता. हल्ल्याच्या केवळ एक दिवस आधी, १० नोव्हेंबर २०२६ रोजी, लश्करचा कमांडर लतीफ भट आणि दहशतवादी उमर निसार दार यांनी कुलगाम जिल्ह्यातील अनेक संवेदनशील भागांना भेट दिली. त्यांनी मीर बाजार, अखरान, हब्लिश आणि किलम यांसारख्या भागांना भेट दिली आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने असलेल्या ठिकाणांची कसून टेहळणी केली. हा संपूर्ण दहशतवादी कट स्थानिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झाला होता.

टेहळणीच्या दुसऱ्या दिवशी, ११ नोव्हेंबर रोजी, त्या दोन दहशतवाद्यांनी एका सुनियोजित हल्ल्यात अखरान भागातील सीआरपीएफच्या चौकीवर अचानक हल्ला केला. हल्ला केल्यानंतर ते घटनास्थळावरून तात्काळ पळून गेले. तपासाअंती सुरक्षा दलांनी सूत्रधार लतीफ भट याची ओळख पटवून त्याच्याविरोधात मोहीम सुरू केली.

 

Web Title: Lashkar e taiba commander latif bhat encounter by security forces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • Jammu and Kashmir

संबंधित बातम्या

Kulgam Terror Attack: कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; तीन जवान गंभीर जखमी, लश्कर कमांडर लतीफ भटचा हात असल्याचा संशय
1

Kulgam Terror Attack: कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; तीन जवान गंभीर जखमी, लश्कर कमांडर लतीफ भटचा हात असल्याचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.