Latur youth detained by Delhi Police, protest outside Parliament with yellow smoke pipe, action taken for breaching security
Latur youth detained by Delhi Police, protest outside Parliament with yellow smoke pipe, action taken for breaching security

Security Breach In Lok Sabha : लातूरचा तरुण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, सुरक्षा भेदल्याने कारवाई लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामधील एक तरुण महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळत आहे.

  नवी दिल्ली : संसदेत (Parliament Winter Session 2023) प्रेक्षक गॅलरीतून उडी मारुन सुरक्षा भेदल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. प्रेक्षक गॅलरीतून (Audience Gallery) दोघांनी उडी मारल्याने भर लोकसभेत (Lok Sabha) एकच हल्लकल्लोळ माजला.

  लोकसभेबाहेर धुराच्या नळकांड्या फोडल्याने

  लोकसभेबाहेर धुराच्या नळकांड्या फोडल्याने त्याचदरम्यान लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात (Security Breach) घेण्यात आले आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील (Maharashtra News) लातूर जिल्ह्यातला (Latur District) आहे.

  लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलकांवर कारवाई

  लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही 42 वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर 25 वर्षीय अमोल शिंदे (Amol Shinde) हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

  संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन येथे सुरू होते संसद भवन

  हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील (Delhi) संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) इथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते. त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलं.
  अमोल शिंदे मूळचा लातूरचा असल्याचे कळाले आहे.

  दरम्यान, अमोल धनराज शिंदे हा सुद्धा संसदेबाहेरील आंदोलनात सहभागी होता. ट्रान्सपोर्ट भवन (Transport Bhawan) येथे हे आंदोलन सुरू होते. त्यावेळी या आंदोलकांकडे कलर स्मोक अर्थात पिवळ्या रंगाच्या धुराच्या नळकांड्या सापडल्याने सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत, आंदोलकांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांपैकी एक अमोल शिंदे नावाच तरुण मूळचा लातूर जिल्ह्यातील आहे.

  संसदेबाहेर दोघांचं आंदोलन, महाराष्ट्रातील तरुण ताब्यात
  संसदेबाहेरही दोन व्यक्तींनी गोंधळ घातल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी एक तरुण आणि एक महिला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले आहे. रंगीत धुराच्या नळकांड्या या दोघांनी संसदेबाहेर जाळल्या. तसेच, दोघांनीही घोषणाबाजीही केली. महत्त्वाची बाब म्हणजे, दोघांपैकी एक मुलगा महाराष्ट्रातील आहे. 25 वर्षांचा अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तर लोकसभेबाहेर गोंधळ घालणारी 42 वर्षीय नीलम हरियाणातील हिस्सार भागातील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.