Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती; लवकरच तारीख होणार जाहीर; वाचा सविस्तर

  • By युवराज भगत
Updated On: Feb 17, 2024 | 07:57 PM
लोकसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती; लवकरच तारीख होणार जाहीर; वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

Rajiv Kumar On Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे मोठे वक्तव्य मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commission Rajiv Kumar) राजीव कुमार यांनी केले आहे. लोकसभेसोबत काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत असं ते म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्यानंतर आता लवकरच निवडणुकांच्या घोषणा केल्या जातील अशी अटकळ बांधली जात आहे.

VIDEO | Here's what Chief Election Commissioner Rajiv Kumar said at a press conference in Bhubaneswar, Odisha.

"The (Election) Commission has tried to make electoral rolls more inclusive. We made special efforts for 3,380 third-gender voters to enroll them," he said.

(Full… pic.twitter.com/UypEjtWRM0

— Press Trust of India (@PTI_News) February 17, 2024

 

काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त?
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “आम्ही 2024 च्या संसदीय निवडणुका आणि ओडिशा राज्याची विधानसभा निवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, त्याची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओडिशामध्ये या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशाच्या निवडणुकाही जाहीर केल्या जाऊ शकतात. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे.

किती टप्प्यात मतदान होणार?
2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 9 टप्प्यांत मतदान झाले होते. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 7 टप्प्यांत मतदान झाले होते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुका किती टप्प्यात होतील याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाईल.

नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा
लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये मुख्य लढत ही भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात होणार आहे. भाजप आणि एनडीएचा चेहरा नरेंद्र मोदी हेच असून त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार याबाबत अद्यापि स्पष्टता नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका जाहीर सभेत सांगितले होते की, लोकसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्य 370 जागा जिंकण्याचे असून एनडीएचे लक्ष्य 400 हून अधिक जागा जिंकण्याचे आहे.

Web Title: Lok sabha election 2024 date decided the chief election commissioner said hai ready hum nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2024 | 07:55 PM

Topics:  

  • Chief Election Commissioner
  • Lok Sabha Election

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.