Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का? ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज

पोल ट्रॅकर'च्या या ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील नागरिकांनी देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्या नावाला ५८ टक्के पसंती दिली आहे. सर्वेक्षणात 43 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामावर समाधान व्यक्त केलं आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 12, 2026 | 12:58 PM
Sanjay Raut

Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • देशभरातील ५४३ मतदारसंघांतील ४ लाख ५३ हजार नागरिकांचे मत.
  • राम मंदिर आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे मोदींची जादू फिकी
  • राम मंदिर आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे मोदींची जादू फिकी
Poll Tracker Mood Of India Survey: देशात आताच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपप्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून वर्तवण्यात आली आहे. पोल ट्रॅकर या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे. याच सर्वेक्षणाच्या निकालाचे ट्विट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत एक व्हिडीओ ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

“अब अच्छे दिन आयेंगे! या अच्छेवाले पुराने दिन वापस आयेंगे! मोदी शहा जायेंगे! जरूर जायेंगे! असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. या ट्विटसोबत त्यांनी ‘पोल ट्रॅकर’च्या सर्वेक्षणाचे विश्लेषण करणारा व्हिडीओही शेअर केला आहे.

Monsoon Session Parliament News 2026: १७ दिवस, १६ तास अन १०८ कोटींचे नुकसान; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत काय घडले?

‘मूड ऑफ इंडिया’ सर्वेक्षणात काय?

‘पोल ट्रॅकर’ने ‘मूड ऑफ इंडिया’ या नावाने नुकतेच एक सर्वेक्षण केल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणाची सॅम्पल साईझ 4 लाख 53 हजार इतकी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोल ट्रॅकरच्या सर्वेक्षणात, सध्याच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाल्यास भाजपप्रणित एनडीए आघाडीला राम मंदिरातील कथित दान चोरी घोटाळा आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनातील लाठीचार्ज यांमुळे मोठा फटका बसू शकतो.

Poll Tracker Survey OF MOOD OF INDIA 2026 ⚫️ सबसे लोकप्रिय youth leader ? ▪️ नरेन्द्र मोदी — 36%
▪️ राहुल गाँधी — 58%
▪️अन्य — 06%#MoodOfIndia2026 #PollTracker #OpinionSurvey #PublicOpinion pic.twitter.com/zupMdTl5GV
— Poll Tracker (@PollTracker) August 10, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे सलग 12 वर्षे सत्तेत असूनही भाजपला आतापर्यंत अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा मोठा फटका बसलेला नव्हता. मात्र, राम मंदिर आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे मोदींची जादू फिकी पडण्याची शक्यता या सर्वेक्षणातून वर्तविण्यात आली आहे.

543 लोकसभा मतदारसंघांत सर्वेक्षण

‘पोल ट्रॅकर’कडून देशातील 3 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या कालावधीत अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान चोरी घोटाळा आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचे मुद्दे चांगलेच चर्चेत होते.

सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास इंडिया आघाडीला 44 टक्के मते मिळू शकतात आणि 280 जागा मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, भाजपप्रणित एनडीएला 40 टक्के मते मिळून त्यांच्या जागांचा आकडा 240 पर्यंत खाली येऊ शकतो.

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले; ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 

तर इतर पक्षांना 16 टक्के मते मिळण्याचा आणि लोकसभेच्या 23 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वेक्षणाच्या दाव्यांवरून संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी-शाह यांच्या नेतृत्वावर निशाणा साधला असून, या आकडेवारीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

‘पोल ट्रॅकर’च्या या ताज्या सर्वेक्षणानुसार, देशातील नागरिकांनी देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून राहुल गांधी यांच्या नावाला ५८ टक्के पसंती दिली आहे. सर्वेक्षणात 43 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामावर समाधान व्यक्त केलं आहे. तर 47 टक्के लोकांनी असमाधान व्यक्त केले आहे. यासोबतच सर्वेक्षणातील ५८ टक्के लोक एनडीए सरकारच्या कामकाजावर नाराज असल्याचेा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.

तर दुसरीकडे या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 61 टक्के लोकांनी लोकसभेचे सध्याचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांच्या कामावर समाधानी असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांच्या चांगल्या भविष्यासाठी देशाचा भावी नेता म्हणून राहुल गांधी यांच्या नावाला 69 टक्के लोकांनी पसंती दिली आहे, तर नरेंद्र मोदींच्या नावाला केवळ 23 टक्के तर पसंती देण्यात आली आहे.

अब अच्छे दिन आयेंगे!
या
अच्छेवाले पुराने दिन वापस आयेंगे!
मोदी शहा जायेंगे!
जरूर जायेंगे! https://t.co/2e8g5Eu0E4
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 12, 2026

Web Title: National newssanjay raut tweets poll tracker survey predicts bjp nda setback lok sabha election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • BJP
  • Lok Sabha Election
  • national news
  • Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
1

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
2

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
3

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
4

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.