Lok-Sabha
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपप्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळाले आहे. त्यानुसार, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. त्यातच 24 जूनपासून सुरू होणाऱ्या 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वीच लोकसभेचे अध्यक्ष कोण असणार या चर्चांनाही उधाण आले आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी तेलुगू देसम पक्षासह संयुक्त जनता दलही इच्छुक आहे. यासोबतच नवीन सभापतींबाबत घटक पक्षांमध्ये नाराजी वाढली आहे. टीडीपीकडून सर्वात मोठा दबाव असल्याचे सांगितले जात आहे की, त्यांना स्वतःचा लोकसभा अध्यक्षपद बनवायचा आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष त्यासाठी तयार नाही. टीडीपी ठाम राहिल्यास नायडू नाही म्हणू शकत नाहीत. त्यामुळे भाजप डी. पुरंदेश्वरी यांचे नाव पुढे करू शकते, अशी अटकळ आहे.
दरम्यान, पुरंदेश्वरी या आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्षा आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीच्या बहिणी आहेत. अशा परिस्थितीत टीडीपीला त्यांच्या उमेदवारीला विरोध करणे सोपे जाणार नाही.