Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव दुर्दैवी! ‘सदन म्हणजे जत्रा नाही, नियमानेच….’; अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

लोकसभेत अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. संसदीय नियम आणि अध्यक्षांच्या अधिकारांवर त्यांनी भाष्य केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 11, 2026 | 06:52 PM
अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल (Photo Credit- X)

अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • लोकसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव दुर्दैवी!
  • ‘सदन म्हणजे जत्रा नाही, नियमानेच….’
  • अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल
लोकसभा अध्यक्षांविरुद्ध विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव ही सामान्य घटना नसून अत्यंत खेदजनक बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे. तब्बल चार दशकांनंतर अशा प्रकारचा प्रस्ताव संसदेत मांडला गेला आहे. “अध्यक्ष हे केवळ एका पक्षाचे नसून संपूर्ण सभागृहाचे असतात आणि ते सदस्यांच्या अधिकारांचे संरक्षक असतात,” अशा शब्दांत शाह यांनी विरोधकांच्या भूमिकेचा निषेध केला.

लोकशाहीच्या सर्वोच्च पंचायत प्रमुखावर संशय घेणे चुकीचे

अमित शाह लोकसभेत बोलताना म्हणाले की, “लोकसभा ही देशातील लोकशाहीची सर्वात मोठी पंचायत आहे. जगामध्ये भारतीय लोकशाहीची एक प्रतिष्ठा आहे. जेव्हा या पंचायतीच्या प्रमुखावर आणि त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, तेव्हा संपूर्ण जगासमोर आपल्या लोकशाही व्यवस्थेबद्दल शंका निर्माण होते. अध्यक्षांच्या निर्णयावर असहमती असू शकते, परंतु त्यांच्या निष्ठेवर सवाल उठवणे हे लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्यासारखे आहे.”

VIDEO | Delhi: In Lok Sabha, Union Home Minister Amit Shah (@AmitShah) speaks on no-confidence motion against Lok Sabha Speaker Om Birla. He says, “This incident is not normal. After four decades, a no-confidence motion has been brought against Lok Sabha Speaker…The Speaker… pic.twitter.com/qqK7hLzmEB — Press Trust of India (@PTI_News) March 11, 2026

‘सदन म्हणजे जत्रा नाही’; नियमांचे पालन अनिवार्य

सभागृहाच्या कामकाजावर भाष्य करताना शाह यांनी विरोधकांना नियमांची आठवण करून दिली. ते म्हणाले, “संसद म्हणजे एखादी जत्रा नाही, जिथे कोणीही कसेही वागू शकेल. सभागृह हे परस्परांवरील विश्वासावर चालते आणि त्यासाठी ठराविक नियमावली आहे. जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल, तर अध्यक्षांना त्यांना रोखण्याचा, टोकण्याचा आणि प्रसंगी बाहेर काढण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे नियम आज आम्ही बनवलेले नसून पंडित नेहरूंच्या काळापासून चालत आलेले आहेत.”

केरळमध्ये BJP चा प्रवेश? पंतप्रधान मोदींनी फुंकले रणशिंग; 5 नवीन ट्रेन्स अन्…

अनुशासन नसेल तर माईक बंद होणारच!

विरोधकांकडून होणाऱ्या ‘माईक बंद’च्या आरोपांना उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, “सभागृहात भाषण करताना प्रत्येक सदस्याने अध्यक्षांच्या माध्यमातून बोलणे अपेक्षित असते. जर अनुशासनाचे उल्लंघन झाले, तर माईक बंद करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. गंभीर अव्यवस्था निर्माण झाल्यास सदन स्थगित करणे, सदस्यांना निलंबित करणे किंवा असंसदीय शब्द कामकाजातून काढून टाकणे, हे अध्यक्षांचे घटनात्मक दायित्व आहे. पंतप्रधान मोदींच्या खुर्चीपर्यंत महिला खासदारांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करणे हे संसदीय शिष्टाचाराला धरून नाही.”

चार दशकांनंतरची ऐतिहासिक पण खेदजनक घटना

शाह यांनी ऐतिहासिक संदर्भांचा उल्लेख करत सांगितले की, भाजप प्रदीर्घ काळ विरोधी पक्षात बसला होता, मात्र आम्ही कधीही अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला नाही. आतापर्यंत केवळ तीनदा असा प्रस्ताव आला असून, प्रत्येक वेळी तो लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा ठरला आहे. १० तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या चर्चेत ४२ खासदारांनी आपली मते मांडली. अध्यक्षांच्या नियुक्तीच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही त्यांना आसनस्थ केले होते, याचा अर्थ त्यांना सर्वांचे समर्थन होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

LPG गॅस बुकिंग करूनही डिलिव्हरी मिळेना? मग ‘या’ नंबरवर करा तक्रार; Bharat, Indane आणि HP चे अधिकृत हेल्पलाईन नंबर जारी

Web Title: Losabha amit shahs attack on the opposition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Amit Shah
  • central goverment
  • Loksabha

संबंधित बातम्या

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती
1

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती

West Bengal Election 2026 | यावेळची लढाई ममता साठी निर्णायक | Mamta Banerjee | TMC
2

West Bengal Election 2026 | यावेळची लढाई ममता साठी निर्णायक | Mamta Banerjee | TMC

Amit Shah : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर
3

Amit Shah : “10 मिनिटांमध्ये आलोच…! महिलेच्या सोशल मीडिया कमेंटला अमित शाहांनी दिले उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.