LPG गॅस बुकिंग करूनही डिलिव्हरी मिळेना? मग 'या' नंबरवर करा तक्रार (Photo Credit- X)
सरकारने अलीकडेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग नियमात बदल केला आहे. आता दोन सिलिंडरमधील बुकिंगचा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच, एकदा सिलिंडर घेतल्यावर तुम्हाला पुढील बुकिंगसाठी २५ दिवस वाट पाहावी लागेल. या तांत्रिक बदलामुळे काही भागात डिलिव्हरीला विलंब होत असल्याचे चित्र आहे. मात्र, जर डीलर जाणूनबुजून उशीर करत असेल किंवा जादा पैसे मागत असेल, तर ते बेकायदेशीर आहे.
जर तुमच्या गॅस एजन्सीकडून वेळेवर सेवा मिळत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक प्रमुख गॅस कंपनीने ग्राहकांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत:
इंडेनच्या ग्राहकांना डिलिव्हरीमध्ये समस्या असल्यास किंवा गॅस चोरीची शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल:
जर भारत गॅसचे वितरक जादा दराची मागणी करत असतील किंवा सिलिंडर वेळेवर देत नसतील, तर येथे कॉल करा:
एचपी गॅसचे ग्राहक डीलरच्या तक्रारीसाठी या अधिकृत क्रमांकांचा वापर करू शकतात:
तज्ज्ञांच्या मते, देशात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जागतिक परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून घरगुती पुरवठा खंडित होणार नाही, याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बुकिंग’ करण्याऐवजी ग्राहकांनी सतर्क राहावे. जर डीलरकडून प्रतिसाद मिळत नसेल, तर आपल्या अधिकारांचा वापर करून हेल्पलाईनवर तक्रार नोंदवणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.






