Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG गॅस बुकिंग करूनही डिलिव्हरी मिळेना? मग ‘या’ नंबरवर करा तक्रार; Bharat, Indane आणि HP चे अधिकृत हेल्पलाईन नंबर जारी

देशातील एलपीजी संकट आणि गॅस डिलिव्हरीला होणाऱ्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर, भारत, इंडेन आणि एचपी गॅसने अधिकृत तक्रार क्रमांक जारी केले आहेत. वाचा सविस्तर माहिती.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 11, 2026 | 05:06 PM
LPG गॅस बुकिंग करूनही डिलिव्हरी मिळेना? मग 'या' नंबरवर करा तक्रार (Photo Credit- X)

LPG गॅस बुकिंग करूनही डिलिव्हरी मिळेना? मग 'या' नंबरवर करा तक्रार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • LPG गॅस बुकिंग करूनही डिलिव्हरी मिळेना?
  • मग ‘या’ नंबरवर करा तक्रार
  • Bharat, Indane आणि HP चे अधिकृत हेल्पलाईन नंबर जारी
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भारतातही एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, घरगुती एलपीजी पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून सामान्य जनतेच्या गरजांना प्राधान्य दिले जात आहे. तरीही, अनेक शहरांतून गॅस वेळेवर न मिळण्याच्या किंवा वितरकांच्या मनमानीच्या तक्रारी येत आहेत. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल, तर तुम्ही थेट कंपनीकडे दाद मागू शकता.

बुकिंगच्या नियमात बदल: २५ दिवसांची अट

सरकारने अलीकडेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग नियमात बदल केला आहे. आता दोन सिलिंडरमधील बुकिंगचा कालावधी २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच, एकदा सिलिंडर घेतल्यावर तुम्हाला पुढील बुकिंगसाठी २५ दिवस वाट पाहावी लागेल. या तांत्रिक बदलामुळे काही भागात डिलिव्हरीला विलंब होत असल्याचे चित्र आहे. मात्र, जर डीलर जाणूनबुजून उशीर करत असेल किंवा जादा पैसे मागत असेल, तर ते बेकायदेशीर आहे.

डीलरची मनमानी? ‘या’ टोल-फ्री नंबरवर करा तक्रार

जर तुमच्या गॅस एजन्सीकडून वेळेवर सेवा मिळत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक प्रमुख गॅस कंपनीने ग्राहकांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत:

१. इंडेन गॅस (Indane Gas)

इंडेनच्या ग्राहकांना डिलिव्हरीमध्ये समस्या असल्यास किंवा गॅस चोरीची शंका असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल:

  • टोल-फ्री नंबर: १८००-२३३३-५५५
  • एलपीजी बुकिंग आणि तक्रार: ७७१८९५५५५५

रेल्वे प्रवाशांच्या जेवणावर गॅस टंचाईचे सावट! स्थानकांवरील स्टॉल्समध्ये आता ‘नो गॅस’; IRCTC ने सुचवला आधुनिक पर्याय

२. भारत गॅस (Bharat Gas)

जर भारत गॅसचे वितरक जादा दराची मागणी करत असतील किंवा सिलिंडर वेळेवर देत नसतील, तर येथे कॉल करा:

  • टोल-फ्री नंबर: १८००-२२-४३४४
  • एलपीजी बुकिंग नंबर: ७७१५०१२३४५

३. एचपी गॅस (HP Gas)

एचपी गॅसचे ग्राहक डीलरच्या तक्रारीसाठी या अधिकृत क्रमांकांचा वापर करू शकतात:

  • टोल-फ्री नंबर: १८००-२३३३-५५५
  • एचपी ‘एनी टाईम’ एलपीजी: ९४९३६०२२२२

घाबरू नका, सतर्क राहा!

तज्ज्ञांच्या मते, देशात सध्या एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जागतिक परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून घरगुती पुरवठा खंडित होणार नाही, याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून ‘पॅनिक बुकिंग’ करण्याऐवजी ग्राहकांनी सतर्क राहावे. जर डीलरकडून प्रतिसाद मिळत नसेल, तर आपल्या अधिकारांचा वापर करून हेल्पलाईनवर तक्रार नोंदवणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

LPG Supply Shortage: गॅस टंचाईमुळे मोबाईल नेटवर्क गायब होणार? ५ मार्चपासून टॉवर कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद

Web Title: Lpg gas delivery not received despite booking then complain on this number

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Central Governement
  • LPG

संबंधित बातम्या

अमेरिका इराणचं पुन्हा फिस्कटलं? जागतिक बाजारात खळबळ; कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला लागला ब्रेक, आता पेट्रोल-डिझेलच्या किमती…
1

अमेरिका इराणचं पुन्हा फिस्कटलं? जागतिक बाजारात खळबळ; कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला लागला ब्रेक, आता पेट्रोल-डिझेलच्या किमती…

Supreme Court Lawyer: सर्वोच्च न्यायालयात वकील कसे बनायचे? जाणून घ्या आवश्यक पात्रता एका क्लिकवर…
2

Supreme Court Lawyer: सर्वोच्च न्यायालयात वकील कसे बनायचे? जाणून घ्या आवश्यक पात्रता एका क्लिकवर…

सायलेंट अटॅक… गेल्या 15  दिवसांत ‘या’ वस्तूंच्या किमती गुपचूप वाढल्या आणि तुम्हाला कळलंच नाही? लगेच तपासा यादी
3

सायलेंट अटॅक… गेल्या 15 दिवसांत ‘या’ वस्तूंच्या किमती गुपचूप वाढल्या आणि तुम्हाला कळलंच नाही? लगेच तपासा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.