Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manipur मध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर भीषण हल्ला; 2 जवान शहीद; तातडीने…

Assam Rifiles: मणीपुरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करताच लष्कराने देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने देखील गोळीबार सुरू केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2025 | 09:32 PM
Manipur मध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर भीषण हल्ला; 2 जवान शहीद; तातडीने…
Follow Us
Close
Follow Us:

मणीपुरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला 
भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला 
अनेक जवान जखमी झाल्याचे माहिती

Manipur Army Attack: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार पेटला आहे. आसाम रायफल्सच्या जवानांवर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान जखमी झाल्याचे समजते आहे. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेक जवान जखमी झाले आहेत.

अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करताच लष्कराने देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने देखील गोळीबार सुरू केला आहे. सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. हा हल्ला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला. हा हल्ला झाला तेव्हा आसाम रायफल्सचा ताफा बिष्णूपुरकडे जात होती.

मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; PM मोदींच्या दौऱ्यानंतर चुराचंदपूरमध्ये RAFवर दगडफेक

या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हा हल्ला अचानकपणे झाल्याचे प्राथमिक माहिती म्हटले जात आहे. मोठ्या संख्येने आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सैनिकांच्या ताफ्यावर सुरू केला. यामध्ये 2 जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान जखमी झाले आहेत.

या हल्ल्यानंतर आसाम रायफल्सने या संपरून परिसराला वेढा घातला आहे. स्थानिक पोलिस आणि लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

PM मोदींच्या दौऱ्यानंतर चुराचंदपूरमध्ये RAFवर दगडफेक

मागील काही वर्षे मणिपूर हे जळत असून जातीय हिंसाचार वाढला आहे. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार कमी करण्यास आणि शांतता प्रस्थापित करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. यानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौरा देखील केला. मात्र पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे.

PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान

गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुराचंदपूरला भेट दिली. दोन वर्षांनंतर मणिपूरला त्यांचा हा पहिलाच दौरा होता. एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी राज्यातील लोकांच्या धाडसाचे आणि संयमाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी निघताच मणिपूरमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. भेटीनंतर राज्यातील त्याच जिल्ह्यात हिंसाचार उफाळला. यादरम्यान रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) च्या जवानांवरही दगडफेक करण्यात आली. प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांना सोडल्यानंतर परिस्थिती सामान्य होत आहे.

Web Title: Manipur attack on assam rifiles canvoy 2 soldiers martyr breaking marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 09:14 PM

Topics:  

  • indian army
  • Manipur Violence
  • terror attack

संबंधित बातम्या

Pulwama Terror Attack 2019: पुलवामा हल्ल्याची सात वर्षे: आजही कायम आहेत ‘हे’ अस्वस्थ करणारे पाच प्रश्न
1

Pulwama Terror Attack 2019: पुलवामा हल्ल्याची सात वर्षे: आजही कायम आहेत ‘हे’ अस्वस्थ करणारे पाच प्रश्न

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज
2

भारतीय शूर सैन्यांमध्ये कमालीची ताकद अन् धैर्य; फक्त सरकारशी स्पष्ट संवादाची गरज

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश
3

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश

पोखरणच्या रणांगणावर ‘रुद्र शक्ती’ गडगडाट; अपाचे हेलिकॉप्टरच्या घिरट्या,  तोफा अन्…;
4

पोखरणच्या रणांगणावर ‘रुद्र शक्ती’ गडगडाट; अपाचे हेलिकॉप्टरच्या घिरट्या, तोफा अन्…;

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.