पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर दौरा केल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे (फोटो - सोशल मीडिया)
मणिपूर : मागील काही वर्षे मणिपूर हे जळत असून जातीय हिंसाचार वाढला आहे. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार कमी करण्यास आणि शांतता प्रस्थापित करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौरा देखील केला. मात्र पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी चुराचंदपूरला भेट दिली. दोन वर्षांनंतर मणिपूरला त्यांचा हा पहिलाच दौरा होता. एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी राज्यातील लोकांच्या धाडसाचे आणि संयमाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी निघताच मणिपूरमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. भेटीनंतर राज्यातील त्याच जिल्ह्यात हिंसाचार उफाळला. यादरम्यान रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) च्या जवानांवरही दगडफेक करण्यात आली. प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांना सोडल्यानंतर परिस्थिती सामान्य होत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधानांचे कटआउट फाडल्याबद्दल दोन तरुणांना ताब्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान लावण्यात आलेल्या पोस्टर्स आणि कटआउट्सचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतल्यावर हिंसाचार सुरू झाला. गुरुवारी रात्री पिअर्सनमुन आणि फाइलेन बाजार भागात अनेक पोस्टर्स फाडण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली. पोलिसांनी काही तरुणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले, त्यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. यानंतर स्थानिक लोक चुडाचंदपूर पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने जमले. जमावाने प्रथम घोषणाबाजी केली आणि नंतर पोलिस ठाण्याकडे कूच केली. यादरम्यान आरएएफ जवानांवर दगडफेक करण्यात आली. सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु जमाव हिंसक होत राहिला.
पोलीस अधिकाऱ्याने काय म्हटले?
दुपारी परिस्थिती खूपच तणावपूर्ण बनली होती असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. खबरदारी म्हणून आरएएफ आणि पोलीस दल तैनात करण्यात आले होते. ड्युटी मॅजिस्ट्रेटच्या सुनावणीनंतर दोन्ही तरुणांना सोडून देण्यात आले, त्यानंतर वातावरण हळूहळू शांत झाले. पोलिसांनी सांगितले की, तरुणांना अटक करण्यात आली नव्हती, तर त्यांना चौकशीसाठी आणण्यात आले होते. स्थानिक लोकांनी आरोप केला की ही अटक बेकायदेशीरपणे करण्यात आली होती, ज्यामुळे संताप व्यक्त झाला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
२०२३ मध्ये हिंसाचार उफाळला
हे लक्षात घेण्यासारखे आहे की मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये गंभीर जातीय हिंसाचार झाला होता. तेव्हापासून राज्यातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य झालेली नाही. पंतप्रधानांच्या भेटीकडे राज्यात स्थिरता आणि शांतता आणण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात होते, परंतु ताज्या घटनेने पुन्हा चिंता निर्माण केली आहे.