Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: एकनाथ शिंदेंनी ‘या’ प्रकरणावरून ठाकरेंना डिवचलं

Marathi breaking live marathi headlines update 09 Jan 2025: आज 9 जानेवारी 2025 रोजी देश, परदेशात, राज्यस्तरावरील, शासकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 09, 2025 | 10:11 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे १८ व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे उद्घाटन करतील. या दरम्यान, पंतप्रधान प्रवासी भारतीय एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मेघालयातील री-भोई जिल्ह्यातील उमियम येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) सुवर्ण महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करतील. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील राष्ट्रपतींसोबत असतील. दिवसभराच्या बातम्यांशी संबंधित मोठे अपडेट्स खाली वाचा…

The liveblog has ended.
  • 09 Jan 2025 10:04 PM (IST)

    09 Jan 2025 10:04 PM (IST)

    Eknath Shinde: "...अशा प्रकारची जात मी पहिल्यांदा बघितली"; एकनाथ शिंदेंनी 'या' प्रकरणावरून ठाकरेंना डिवचलं

    आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा भेट घेतली आहे. वरळी मतदारसंघातील विविध विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणारे, घटनाबाह्य सरकार म्हणणारे तसेच एक तर तू राहशील किंवा मी राहीन अशी टोकाची भूमिका घेणारे इतक्या लवकर आपले रंग बदलतील असे वाटले नव्हते."

    पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, " सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची जात मी पहिल्यांदा बघितली. ज्यांनी लोकांना दूर केले, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा केली त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे. राज्याच्या जनतेने महाविकास आघाडील संस्कार, संस्कृति शिकवली आहे. आधी ते शिव्या, शापाशिवाय काही बोलत नव्हते. पहिले सरकार आले तेव्हा टीका करण्याशिवाय काही केले नाही. मात्र आम्ही आरोपाना कामातून उत्तर दिले आहे."

  • 09 Jan 2025 09:27 PM (IST)

    09 Jan 2025 09:27 PM (IST)

    ‘HMPV’च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका दक्ष; ‘या’ रूग्णांचे सर्वेक्षण होणार

    ह्युमन मेटान्यूमो (एचएमपीव्ही) या विषाणूचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.

  • 09 Jan 2025 08:28 PM (IST)

    09 Jan 2025 08:28 PM (IST)

    अति घाई संकटात नेई! घाईघाईत महिला रेल्वे रुळावर पडली इतक्यात…; VIDEO व्हायरल

    सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड आणि भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच अनेक अपघातांचे देखील व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा हे व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना घाम सुटला आहे.

    बऱ्याचवेळा लोक कुठेही जाण्यास उशीर झाला की घई करतात. अशा वेळी लोक रस्ता, रेल्वेरुळवरुन पळत सुटतात. मात्र, अति घाई संकटात नेई असे काही तरी घडते. अनेकदा रस्ता क्रॉस करताना किंवा रेल्वेरुळावरुन जाताना अपघात होऊ शकतो. व्यक्ती संकंटात सापडू शकतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ या संबंधीतच आहे. या व्हिडिओत एक महिला मालगाडीच्या खाली अडकली आहे. सध्या हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही.

  • 09 Jan 2025 07:28 PM (IST)

    09 Jan 2025 07:28 PM (IST)

    Bangladesh Politics: बांगलादेशवर पुन्हा स्त्री शक्तीची सत्ता? ‘या’ दोन नेत्या एकत्र येण्याने बदलणार राजकीय समीकरण

    बांगलादेशमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रचंड उलथापालथ सुरु आहे. शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर सत्त्तापालट झाले आणि मोहम्मद युनूसचे अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, सध्या देशातील परिस्थिती पाहता हे सरकार अपयशी ठरले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकारच्या विरोधात उफाळलेले विद्यार्थी आंदोलन, तसेच 1971 नंतर पहिल्यांदाच बांगलादेशातून पाकिस्तानी लष्कराची माघार, अल्पसंख्याकांवर आणि विशेषतः हिंदूंविरुद्ध सतत होणारा हिंसाचार असो. युनूसचे सध्याचे सरकार कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.

  • 09 Jan 2025 06:10 PM (IST)

    09 Jan 2025 06:10 PM (IST)

    छत्तीसगडमध्ये चिमणी कोसळल्याने अनेक कामगार गाडले गेले, बचाव कार्य सुरू

    छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यातील सारगाव येथील कुसुम कारखान्यात चिमणी कोसळल्याने सुमारे अर्धा डझन कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. बचाव पथकाने एका जखमी कामगाराला बाहेर काढले आणि त्याला रुग्णालयात पाठवले, जिथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपास करत आहेत, तर स्थानिक लोकही बचाव कार्यात मदत करत आहेत.

  • 09 Jan 2025 05:54 PM (IST)

    09 Jan 2025 05:54 PM (IST)

    तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी: मुख्यमंत्री नायडू यांनी घटनास्थळाची पाहणी केली

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आज तिरुपती येथील चेंगराचेंगरीच्या ठिकाणाची पाहणी केली. बुधवारी रात्री तिरुमला येथील भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले. वैकुंठ द्वार दर्शनमसाठी तिकिटे मिळविण्याचा प्रयत्न करत असताना शेकडो भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.

  • 09 Jan 2025 05:09 PM (IST)

    09 Jan 2025 05:09 PM (IST)

    आम्रपाली एक्सप्रेसमध्ये प्रवासी आणि टीटीईमध्ये हाणामारी, रेल्वेने चौकशी सुरू केली

    लखनऊच्या आम्रपाली एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशा आणि टीटीईमध्ये वाद झाल्यानंतर हाणामारी झाली, ज्यामध्ये टीटीईने प्रवाशाला बेल्टने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर रेल्वे प्रशासन कृतीत आले. आरोपी टीटी हा लखनऊ रेल्वे विभागात तैनात आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिडिओच्या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

  • 09 Jan 2025 05:08 PM (IST)

    09 Jan 2025 05:08 PM (IST)

    केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून परवेश वर्मा यांच्या विरोधात तक्रार केली

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि भाजप नेते प्रवेश वर्मा यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली. केजरीवाल यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

  • 09 Jan 2025 04:49 PM (IST)

    09 Jan 2025 04:49 PM (IST)

    वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग;डॉक्टरांनी सांगितलं कारण

    दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.कराडच्या डोळे तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम दाखल झाली होती.डोळ्यांना संसर्ग होण्यापाठीमागं झोप पूर्ण होत नसल्याचं कारण असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

  • 09 Jan 2025 03:36 PM (IST)

    09 Jan 2025 03:36 PM (IST)

    ठाकरेंसह 'मविआ'ला झटका; राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची याचिका फेटाळली

    कोल्हापूर ठाकरे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी दाखल केलेली राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची याचिका फेटाळली आहे. हा न्यायालयानकडून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षासह महाविकास आघाडीलाही मोठा झटका मानला जात आहे.

  • 09 Jan 2025 01:25 PM (IST)

    09 Jan 2025 01:25 PM (IST)

    संभल शाही जामा मशीद समिती पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचली

    संभल शाही जामा मशीद समितीने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. स्थिती जैसे थे ठेवण्यासाठी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय या संदर्भात कोणतीही कारवाई किंवा पाऊल उचलू नये, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकेत समितीने म्हटले आहे की, न्यायालयाने प्रशासनाला शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले होते परंतु जिल्हा प्रशासन परिसरातील जुनी मंदिरे आणि विहिरी शोधण्यात व्यस्त आहे.

  • 09 Jan 2025 12:34 PM (IST)

    09 Jan 2025 12:34 PM (IST)

    दिल्लीत भाजप आणि आप यांच्यात लढाई, काँग्रेस फक्त एक प्यादा आहे: केजरीवाल

    अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्ली निवडणुकीतील लढाई भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये आहे. काँग्रेस ही फक्त भाजपची मोहरी आहे

  • 09 Jan 2025 12:16 PM (IST)

    09 Jan 2025 12:16 PM (IST)

    शंभू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याने केले विष प्राशन

    शंभू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याने विष प्राशन केले. शंभू मोर्चात रेशम सिंगने सल्फा प्राशन केला. यानंतर, त्याला गंभीर अवस्थेत राजपुरा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रेशम सिंग हा जगतार सिंग यांचा मुलगा आहे. रेशम हा तरनतारन जिल्ह्यातील पाहु विंडचा रहिवासी आहे. याआधीही एका शेतकऱ्याचा विष प्राशन करून अशाच प्रकारे मृत्यू झाला होता.

  • 09 Jan 2025 11:53 AM (IST)

    09 Jan 2025 11:53 AM (IST)

    ठाकरे गटाकडून वांद्र्यात आंदोलन

    वांद्र्यात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. वरुण सरदेसाईंसह ठाकरे गटातील इतर नेतेही आंदोलनाला उपस्थित आहेत. भारतनगरमध्ये असलेलं अनधिकृत बांधकाम एसआरए पाडणार असून एसआरएच्या कारवाईला ठाकरे गटाकडून विरोध करण्यात येतंय.

  • 09 Jan 2025 11:39 AM (IST)

    09 Jan 2025 11:39 AM (IST)

    शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि इतर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

    शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि इतर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ठाणे, भिवंडी, शहापूर,पालघरमधील जिल्हा प्रमुख, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात संध्याकाळी साडेचार वाजता पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

  • 09 Jan 2025 11:37 AM (IST)

    09 Jan 2025 11:37 AM (IST)

    आज जग भारताचे लक्षपूर्वक ऐकते - पंतप्रधान मोदी

    प्रवासी भारतीय संमेलनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जग भारताचे लक्षपूर्वक ऐकते. आजचा भारत केवळ आपला मुद्दा जोरदारपणे मांडत नाही तर जागतिक दक्षिणेचा आवाज पूर्ण ताकदीने उठवतो.

  • 09 Jan 2025 11:35 AM (IST)

    09 Jan 2025 11:35 AM (IST)

    भविष्य युद्धात नाही तर बुद्धात आहे - पंतप्रधान

    प्रवासी भारतीय संमेलनात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भविष्य युद्धात नाही तर बुद्धात आहे. अनिवासी भारतीयांमुळे मला जगात माझे डोके उंचावण्याची संधी मिळते.

  • 09 Jan 2025 11:07 AM (IST)

    09 Jan 2025 11:07 AM (IST)

    पंतप्रधान मोदींच्या हस्ते १८ व्या प्रवासी भारतीय दिवसाचे उद्घाटन

    ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पंतप्रधान मोदींनी १८ व्या प्रवासी भारतीय दिवसाचे उद्घाटन केले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील या परिषदेत सहभागी होत आहेत.

    #WATCH | Bhubaneswar, Odisha | Speaking at 18th Pravasi Bharatiya Divas, EAM Dr S Jaishankar says, "...In a globalised era, the diaspora only becomes more important with each passing year. Whether it is technology, best practices or recourses. Be it tourism, trade or investment,… pic.twitter.com/h5FCScrazU

    — ANI (@ANI) January 9, 2025

  • 09 Jan 2025 11:07 AM (IST)

    09 Jan 2025 11:07 AM (IST)

    दिल्लीत काँग्रेस आणि आप ने एकत्र निवडणूक लढवली - संजय राऊत

    उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, दिल्लीत काँग्रेस आणि आपने एकत्र निवडणूक लढवावी. दिल्लीत कोणाला पाठिंबा द्यायचा यावर आमची चर्चा सुरू झाली आहे. आम्ही अजून कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवलेले नाही.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events 09 jan 2025 marathi blog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
1

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
4

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.