Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : Ajit Pawar On Delhi Elections: महाराष्ट्रानंतर ‘दादां’चे लक्ष्य दिल्ली विधानसभा; घेतला ‘हा’ महत्वाचा

Marathi breaking live marathi headlines update 17 Jan 2025: आज 17 जानेवारी 2025 रोजी देश, परदेशात, राज्यस्तरावरील, शासकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 19, 2025 | 09:59 AM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking news live updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चे उद्घाटन करतील. हा देशातील सर्वात मोठा मोबिलिटी एक्स्पो आहे जो मोबिलिटी क्षेत्राच्या सर्व पैलूंना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करेल. दिल्ली निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. बुधवारपर्यंत, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी २३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज अमित शाह ट्रेड सेंटर नौरोजी नगर नवी दिल्ली येथे सहकारी संस्था कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करतील. प्रयागराज महाकुंभासाठी राजस्थानमधील कोटा येथून आजपासून विशेष गाड्या सुरू होणार आहेत. ही ट्रेन आठवड्यातून दोन दिवस सोगारिया आणि बनारस दरम्यान धावेल. आयएमडी लखनऊने आज उत्तर प्रदेशात हवामानाचा अंदाज जारी केला आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील ५५ जिल्ह्यांमध्ये दाट धुके असेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज पश्चिम उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस आणि धुक्यासाठी ऑरेंज अलर्ट देखील आहे.

The liveblog has ended.
  • 17 Jan 2025 10:03 PM (IST)

    17 Jan 2025 10:03 PM (IST)

    Ajit Pawar On Delhi Elections: महाराष्ट्रानंतर 'दादां'चे लक्ष्य दिल्ली विधानसभा; घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

    दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदानो होणार आहे. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे.  दरम्यान महराष्ट्र विधानसभेत मोठे यश प्राप्त केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने आपले उमेदवार दिल्ली निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत.

    दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे . सध्या अजित पवार महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सहभागी आहेत. सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदावर कार्यरत आहेत. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवार हे भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी मोठे यश प्राप्त केले आहे. आता त्यांनी दिल्ली विधानसभेसाठी कंबर कसली आहे.

  • 17 Jan 2025 09:30 PM (IST)

    17 Jan 2025 09:30 PM (IST)

    बाप आहे की हैवान! अभ्यास करत नाही म्हणून वडिलांनी 9 वर्षांच्या मुलाला थेट.....; दुर्दैवी घटना वाचाच...

    अभ्यास करत नसल्याच्या कारणाने चिडलेल्या बापाने स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलाला भिंतीवर आपटून गळा दाबून खून केल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातील होळ येथे घडली आहे. आरोपी वडील विजय गणेश भंडलकर याच्यासह खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला मदत करणारी मुलाची आज्जी व मुलाचे चुलते या तिघांवर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

    पोलिसांनी वडील विजय गणेश भंडलकर, आज्जी शालन गणेश भंडलकर, आणि चुलते संतोष भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पियुष ( वय ९ वर्षे) घरात असताना, वडील विजय भंडलकर यांनी त्याला अभ्यासाविषयी खडे बोल सुनावले. “तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागत आहेस, माझी इज्जत घालवतोस," असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला.संतोष भंडलकर याने मुलाला प्रथम  होळ येथे  डॉ जगताप यांच्या रुग्णालयात आणले.नंतर निरा येथील डॉ भट्टड यांच्याकडे नेले. तेथेही मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचे सांगण्यात आले.

  • 17 Jan 2025 08:32 PM (IST)

    17 Jan 2025 08:32 PM (IST)

    आनंद वार्ता! नद्याजोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा

    नद्याजोड प्रकल्पामध्ये गोदावरी खोऱ्यासाठी ४० हजार कोटी, विदर्भासाठी एक लाख कोटी खर्च होणार आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यात ११२ टीएमसी पाणी, तर कृष्णा खोऱ्यात ७० टीएमसी अशा दोन्ही खोऱ्यात एकूण १८२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार असून यामुळे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचा लाभ मराठवाड्यातील सहा जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हयांना होणार आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

  • 17 Jan 2025 08:17 PM (IST)

    17 Jan 2025 08:17 PM (IST)

    किडनी स्टोन क्षणात शरीरातून निघेल बाहेर, फक्त आहारात करा या भाजीचा समावेश; ऑपरेशनचीही गरज भासणार नाही

    किडनी स्टोन किंवा मुतखडा ही एक गंभीर समस्या आहे. याचे वेळीच निराकारण करणे गरजेचे असते अन्यथा ही समस्या आणखीन मोठे रूप घेऊ शकते. मात्र हे देखील तितकेच खरे आहे की, सध्याच्या या धावपळीच्या जीवनात किडनी स्टोनची समस्या आता सामान्य झाली आहे. अनेकांना हा आजार जडला असून लोक याला विना शस्त्रक्रिया करता मुळापासून दूर करण्याचा उपाय शोधत आहेत. किडनी स्टोनमुळे वेदना, जळजळ आणि लघवीत रक्त येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

  • 17 Jan 2025 06:38 PM (IST)

    17 Jan 2025 06:38 PM (IST)

    अशक्तपणा जाणवू लागल्याने केजमधील रुग्णालयात उपचार सुरु

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत खालावल्यामुळे अशक्तपणा आला आहे, डीहायड्रेशन झाले आहे. त्यामुळे हॉस्पिटलला जाणार आहे, तपासणीसाठी. मी फीट असेल तरच शुक्रवारी जवाब देणार आहे, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे. त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याने केजमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • 17 Jan 2025 05:52 PM (IST)

    17 Jan 2025 05:52 PM (IST)

    आयुष्मान भारत योजना हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे: केजरीवाल

    दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी आयुष्मान भारत आरोग्य योजनेला देशातील सर्वात मोठा घोटाळा म्हटले.

  • 17 Jan 2025 04:27 PM (IST)

    17 Jan 2025 04:27 PM (IST)

    सैफवरील हल्ल्यात कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीचा सहभाग नव्हता: मंत्री योगेश कदम

    महाराष्ट्र सरकारचे मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे की, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने कोणत्याही प्रकारच्या धोक्याची पोलिसांना माहिती दिली नाही, त्याने सुरक्षा मागितली नाही. या हल्ल्यामागे कोणत्याही अंडरवर्ल्ड टोळीचा हात नाही. सैफवरील हल्ल्यानंतर सरकार आणि पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे, मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर आहे.

  • 17 Jan 2025 02:27 PM (IST)

    17 Jan 2025 02:27 PM (IST)

    कुख्यात काडिया टोळीतील तीन महिलांना अटक

    दिल्ली पोलिसांच्या दक्षिण जिल्हा पोलिसांच्या मेहरौली पोलिस स्टेशनने कुप्रसिद्ध कडिया गँगच्या तीन महिला सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीतील महिला बाजारपेठा, लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसारख्या गर्दीच्या ठिकाणी लक्ष्य करून चोरी करतात.

  • 17 Jan 2025 01:35 PM (IST)

    17 Jan 2025 01:35 PM (IST)

    प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री 26 जानेवारीपूर्वी जाहीर होईल : बावनकुळे

    पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांबाबात महायुती सरकारकमध्ये कुठलच पेच नाही. युती असल्याने सर्वांच्या मतांचा विचार करावा लागतो. मात्र ही अडचणसुद्धा आता राहिली नाही. येत्या २६ जानेवारीपूर्वी प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर झाल्याचे तुम्हाला दिसेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

  • 17 Jan 2025 12:34 PM (IST)

    17 Jan 2025 12:34 PM (IST)

    PM मोदी हस्ते ऑटो एक्सपो 2025 चे उद्घाटन

    यावेळी होणारा इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो खूप खास आहे कारण यावेळी येथे १०० हून अधिक नवीन वाहने लाँच होणार आहेत. ऑटो कंपोनंटपासून बांधकाम उपकरणे, सायकली आणि भविष्यातील मोबिलिटी तंत्रज्ञानापर्यंत एकूण 9 प्रदर्शने एकाच वेळी आयोजित केली जात आहेत.

  • 17 Jan 2025 12:11 PM (IST)

    17 Jan 2025 12:11 PM (IST)

    पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

    पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आणि आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर जेजुरीजवळ दोन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

  • 17 Jan 2025 11:17 AM (IST)

    17 Jan 2025 11:17 AM (IST)

    सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक

    सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोराने शाहरुख खानच्या घराची रेकीही केल्याचे सांगण्यात येत आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीने शाहरुख खानच्या घराची रेकीही केल्याचे समोर आले आहे.

  • 17 Jan 2025 10:55 AM (IST)

    17 Jan 2025 10:55 AM (IST)

    दीपक तंवर हे दिल्लीच्या देवळी मतदारसंघातून लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पक्षाचे उमेदवार

    दीपक तंवर हे दिल्लीतील देवळी येथून वाल्मिकी लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) उमेदवार असतील. दिल्ली विधानसभेत भाजपने त्यांचे मित्रपक्ष जेडीयू आणि एलजेपी रामविलास यांना प्रत्येकी एक जागा दिली आहे. जेडीयूने बुरारीमधून शैलेंद्र कुमार यांना उमेदवारी दिली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

  • 17 Jan 2025 10:55 AM (IST)

    17 Jan 2025 10:55 AM (IST)

    छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये आयईडी स्फोट, बीएसएफचे दोन जवान जखमी

    छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये आयईडी स्फोट झाला आहे. या स्फोटात बीएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत.

  • 17 Jan 2025 10:53 AM (IST)

    17 Jan 2025 10:53 AM (IST)

    80 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट मोरोक्कोजवळ उलटली

    प्रवाशांना स्पेनला घेऊन जात असलेली बोट मोरोक्कोजवळ उलटल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 40 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. स्थलांतरित हक्क गट ‘वॉकिंग बॉर्डर्स’ने दिलेल्या माहितीनुसार, 50 हून अधिक प्रवासी बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत एकूण 80 प्रवासी होते, असे समजते.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events 17 jan 2025 marathi blog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • maharashtra
  • narendra modi
  • Saif Ali Khan

संबंधित बातम्या

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
1

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
2

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
3

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
4

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.