Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये तातडीने मदत मिळण्यासाठी स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा उपलब्ध करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. महामार्गांवर टोल वसुली केली जात असताना प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगत, ...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 22, 2026 | 05:08 PM
राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

Follow Us
Follow Us:
  • टोल वसुली करता, मग सुरक्षेचे काय?
  • महामार्गांवर स्वतंत्र अग्निशमन यंत्रणेची मागणी
  • महामार्गावरील आगीच्या घटनांवर तातडीने मदत मिळणार कशी?
अनिल कदम, उंब्रज : कागल ते शेंद्रे आणि पुढे पुण्यापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा दळणवळण मार्ग आहे. या मार्गावर कागल, किणी, तासवडे, आणेवाडी आणि खेड-शिवापूर असे पाच टोलनाके आहेत. या सर्व टोलनाक्यांवर रुग्णवाहिका, क्रेन तसेच अपघाताच्या वेळी आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. मात्र अपघातानंतर एखाद्या वाहनाला आग लागली तर तातडीने आग विझविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल यंत्रणेकडे स्वतंत्र अग्निशमन व्यवस्था नसल्याने मलकापूर, कराड, सातारा नगरपालिका तसेच अजिंक्यतारा, कृष्णा आणि सह्याद्री साखर कारखान्यांच्या अग्निशमन दलाच्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागते. राष्ट्रीय महामार्गाच्या वाढत्या वाहतुकीचा विचार करता ही परिस्थिती आता बदलण्याची गरज आहे.

वाहनांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा…

सध्याच्या घडीला वाहनांचे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आधुनिक झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत आजच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा, सेन्सर्स, संगणकीकृत प्रणाली, वायरिंगचे जाळे, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली आणि विविध इलेक्ट्रिकल घटक मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे वाहनांची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सुविधा वाढली असली तरी विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यास वाहनाला आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. काही घटनांमध्ये वाहनाच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट, बॅटरी किंवा इलेक्ट्रिकल घटकांमध्ये बिघाड, अपघातामुळे वायरिंगचे नुकसान किंवा इंधनाची गळती यामुळे आग भडकण्याच्या घटना समोर येत आहेत.

Maharashtra Drought : बळीराजाला बाप्पा पावणार! राज्य सरकार शनिवारपूर्वी पहिली अधिसूचना काढणार, फडणवीसांची मोठी घोषणा

विशेषतः महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना अपघात झाल्यानंतर काही क्षणांत आग लागली, तर परिस्थिती अत्यंत गंभीर बनू शकते. वाहनात चालक आणि प्रवासी अडकले असतील तर त्यांना बाहेर काढण्यासाठी मिळणारा वेळ अक्षरशः काही मिनिटांचा असतो. आधुनिक वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक लॉकिंग आणि इतर स्वयंचलित यंत्रणा असल्याने अपघातानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा यंत्रणा निकामी झाल्यास दरवाजे उघडण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. काही घटनांमध्ये वाहनाचे दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांना तात्काळ बाहेर पडणे कठीण झाल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत आग वाढण्यापूर्वी वाहनातील व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

स्वतंत्र फायर फायटर…

यामुळे राष्ट्रीय महामार्गावर केवळ रुग्णवाहिका आणि क्रेन पुरेशा नाहीत. आगीशी दोन हात करणारी आणि अपघातग्रस्त वाहनातून नागरिकांना बाहेर काढणारी स्वतंत्र फायर फायटर व रेस्क्यू यंत्रणा असणे ही काळाची गरज आहे. घटनास्थळी अग्निशमन वाहन पोहोचण्यासाठी लागणारा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. दूरच्या शहरातून अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत आग वाहनाच्या केबिनपर्यंत पोहोचल्यास जीवितहानीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

कागल ते पुणे या संपूर्ण मार्गावर पाच टोलनाके असताना प्रत्येक टोल व्यवस्थेने आपल्या कार्यक्षेत्रात अत्याधुनिक अग्निशमन आणि बचाव पथक सज्ज ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः प्रत्येक 35 किलोमीटर अंतरात NHAIच्या माध्यमातून स्वतंत्र फायर फायटर केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आता पुढे येणे स्वाभाविक आहे. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक अग्निशमन वाहन, फोम टेंडर, पुरेसा पाणीसाठा, हायड्रॉलिक कटर, दरवाजे आणि वाहनांचे भाग कापण्यासाठी रेस्क्यू उपकरणे, अग्निरोधक साहित्य आणि प्रशिक्षित कर्मचारी असावेत. अपघाताची माहिती टोल नाक्यावरील सीसीटीव्ही किंवा नियंत्रण कक्षाला मिळताच फायर फायटर घटनास्थळी रवाना होण्याची व्यवस्था असावी. रुग्णवाहिका, क्रेन, पोलीस आणि अग्निशमन पथक यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन नियंत्रण व्यवस्था निर्माण करता येईल. अशा यंत्रणेमुळे आग विझविण्याबरोबरच वाहनात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देणे शक्य होईल.

महामार्गावर आज हजारो कोटींची वाहने धावत आहेत. वाहनांची किंमत आणि तंत्रज्ञान वाढले, वाहतुकीचा वेग वाढला; मात्र अपघातानंतर तातडीने जीव वाचविणारी यंत्रणा त्याच वेगाने सक्षम झाली आहे का, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. मलकापूर, कराड, सातारा नगरपालिका तसेच अजिंक्यतारा, कृष्णा आणि सह्याद्री साखर कारखान्यांच्या अग्निशमन दलांनी आपत्कालीन परिस्थितीत अनेकदा मदत केली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील आपत्कालीन अग्निशमन व्यवस्था ही स्थानिक संस्थांच्या मदतीवर अवलंबून न राहता NHAIच्या स्वतःच्या यंत्रणेत असणे अधिक परिणामकारक ठरेल. रुग्णवाहिका जखमींना वाचवते, क्रेन अपघातग्रस्त वाहन हटवते; पण आग लागलेल्या वाहनातून जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी पहिल्या काही मिनिटांत पोहोचणारा फायर फायटरच निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे टोल वसुलीबरोबरच प्रवाशांच्या जीविताच्या सुरक्षेला प्राधान्य देत कागल ते पुणे महामार्गावर प्रत्येक 35 किलोमीटरवर अत्याधुनिक अग्निशमन व रेस्क्यू केंद्र उभारण्याचा निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे.

तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन यंत्रणा आवश्यक

राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत असतात. अनेकदा अपघातानंतर वाहनांना आग लागण्याच्या घटना घडतात. काही घटनांमध्ये प्रवाशांना जीव गमवावा लागतो, तर काही ठिकाणी वाहनांसह लाखो रुपयांचे साहित्य जळून मोठी वित्तीय हानी होते. त्यामुळे अपघातानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचणारी अग्निशमन यंत्रणा असणे अत्यंत आवश्यक आहे.

परवा उंब्रज येथे मालवाहू ट्रकमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने आणि योग्य वेळी अग्निशमन यंत्रणेची मदत मिळाली असती, तर आग वेळीच नियंत्रणात आणून मोठी वित्तीय हानी टाळता आली असती. राष्ट्रीय महामार्गावर अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक अग्निशमन दलावर अवलंबून न राहता NHAIची स्वतःची अत्याधुनिक अग्निशमन व रेस्क्यू यंत्रणा महामार्गावर कार्यान्वित असणे गरजेचे आहे, मनसे युवा सेना पदाधिकारी, उंब्रज अमोल कांबळे यांनी दिली.

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Web Title: Demand for dedicated fire fighter system on national highways road safety along with toll collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Accident
  • highway
  • maharashtra

संबंधित बातम्या

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
1

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
2

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

पालिकेच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा? रस्त्यावर गरम मॅस्टिक, पण बॅरिकेड्सचा पत्ता नाही; वसईत स्कूटीवरून घसरून माय-लेकी गंभीर जखमी
3

पालिकेच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा? रस्त्यावर गरम मॅस्टिक, पण बॅरिकेड्सचा पत्ता नाही; वसईत स्कूटीवरून घसरून माय-लेकी गंभीर जखमी

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
4

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.