
मात्र, प्रसूतीनंतर बाळाचा मृत्यू झाला, त्यानंतर पूजाची प्रकृती खालावली असताना तिला यापूर्वीच उच्चस्तरीय उपचारासाठी का पाठविण्यात आले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हिमोग्लोबिन केवळ ५ ग्रॅम होते
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे यांनी सांगितले की, महिलेचे हिमोग्लोबिन केवळ ५ ग्रॅम होते. गंभीर रक्तक्षयामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. रक्त चढविण्यासह आवश्यक उपचार करण्यात आले. मात्र, प्रसूतीनंतर बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान महिलेचाही मृत्यू झाला. गर्भवतींच्या नियमित तपासणीसह पौष्टिक आहार व उपचार आवश्यक आहेत.
आणि उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयासमोर आक्रोश व्यक्त केला. गर्भावस्थेदरम्यानच हिमोग्लोबिन कमी असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन योग्य उपचार व पोषक आहाराची व्यवस्था केली असती, तर ही परिस्थिती टाळता आली असती, असा आरोप नातेवाईकांनी केला. तसेच प्रकृती गंभीर असताना उच्चस्तरीय उपचारासाठी वेळेत का पाठविण्यात आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मृत महिलेचे काका मास्तरांम कोसरकर यांनी पूजा रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित उपचार घेत असल्याचे सांगितले.
पूजाचे हिमोग्लोबिन कमी असल्याची माहिती वेळेवर देऊन आवश्यक उपचार झाले असते तर परिस्थिती वेगळी असती. रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून गोंदियातील रुग्णालयापर्यंत तिव्यावर झालेल्या संपूर्ण उपचारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
समाजसेवक लोकेश यादव यांनी रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पूजाला देण्यात आलेल्या इंजेक्शनबाबत डॉक्टरांमध्ये कथित मतभेद -झाल्याचा आरोप केला. महिलेचे हिमोग्लोबिन केवळ ५ ग्रॅम होते. होती. रक्त चढवून उपचार करण्यात आले. मात्र, प्रसूतीनंतर बाळाचा व त्यानंतर महिलेचाही मृत्यू झाला. एकाच घटनेत आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उपचाराच्या कोणत्या टप्प्यावर त्रुटी राहिली का, याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली.