Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील अपघाती मृत्यूंमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ६ टक्के घट झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 22, 2026 | 06:52 PM
रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Follow Us
Follow Us:

अपघातग्रस्तांसाठी ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा
108 अन् खासगी रुग्णवाहिका एकाच डिजिटल मंचावर आणण्याचा प्रस्ताव
दर ५० किमीवर सक्षम ट्रॉमा केअरचा विचार

Pratap Sarnaik: राज्यातील रस्ते अपघात आणि त्यामधील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबरोबरच विविध शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली १३ व्या राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली.

बैठकीत परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि इतर संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करून अपघात नियंत्रणासाठी उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला. अपघातग्रस्तांसाठी सुरुवातीचा ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असल्याने या काळात तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

‘पीएम-राहत’ अंतर्गत दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार

अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी ‘पीएम-राहत’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दीड लाख रुपयांपर्यंत आणि कमाल सात दिवसांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उपचार सुरू करण्यात विलंब होऊ नये यासाठी पोलीस नोंदणी, डिजिटल ओळख क्रमांक आणि उपचार मंजुरीची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य, पोलीस आणि परिवहन विभागाने एकत्रित कार्यपद्धती विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

108 आणि खासगी रुग्णवाहिका एकाच डिजिटल मंचावर

अपघात झाल्यानंतर सर्वात जवळ असलेली रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचावी यासाठी 108 सेवा आणि खासगी रुग्णवाहिका एकाच एकात्मिक डिजिटल मंचावर आणण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे.

रुग्णवाहिकांमध्ये कॅमेरा आणि दूरसंचार सुविधा उपलब्ध करून अपघातग्रस्ताची स्थिती रुग्णालयातील डॉक्टरांना थेट पाहता यावी आणि रुग्ण रुग्णालयात पोहोचेपर्यंत आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन करता यावे, याचाही विचार करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी केल्या.

प्रत्येक ५० किलोमीटरवर ट्रॉमा केअर

राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरमधील मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक ५० किलोमीटरच्या परिसरात सक्षम ट्रॉमा केअर सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

समृद्धी महामार्ग, द्रुतगती मार्ग, सागरी मार्ग आणि दुर्गम भागांमध्ये गंभीर अपघात झाल्यास जखमींना तातडीने उपचारासाठी हलवता यावे यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवेचे धोरण तयार करण्याची सूचनाही करण्यात आली.

रस्ता सुरक्षेसाठी १० टक्के निधी राखण्याची सूचना

रस्त्यांचे नियोजन, बांधकाम आणि देखभाल अशा प्रत्येक टप्प्यावर नियमित रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण (Road Safety Audit) करण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली. रस्त्यांमधील अभियांत्रिकी त्रुटी दूर करून अपघातांचा धोका कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीपैकी १० टक्के निधी रस्ता सुरक्षेसाठी राखून ठेवण्याची सूचना करण्यात आली.

अपघाताची वेळ, ठिकाण, वाहनाचा वेग, रस्त्याची रचना, प्रकाशव्यवस्था, पादचारी वाहतूक आणि चालकाची स्थिती यांचा डेटा वापरून शास्त्रीय अभ्यास करण्यावरही भर देण्यात आला. त्याआधारे अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’ ओळखून तेथील उपाययोजना वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

‘वे-इन-मोशन’ तंत्रज्ञानाचा वापर

ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ‘वे-इन-मोशन’ सेन्सरचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच धावत्या वाहनांचे प्रदूषण तपासण्यासाठी ‘पोल्युशन चेक-इन-मोशन’ म्हणजेच रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही विचार आहे. PUC प्रमाणपत्राची वाहन आणि चलन प्रणालीशी हायब्रीड सॉफ्टवेअरद्वारे सांगड घालण्याचे निर्देश देण्यात आले.

११ जिल्ह्यांमध्ये ‘झीरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि SaveLIFE Foundation यांच्या सहकार्याने देशातील १०० क्रिटिकल जिल्ह्यांमध्ये रस्ता सुरक्षेसाठी उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील नाशिक ग्रामीण, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर, सोलापूर ग्रामीण, जळगाव, सातारा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, बीड, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर आणि धुळे या ११ जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

या जिल्ह्यांमध्ये डेटा-आधारित विश्लेषणाच्या माध्यमातून अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी कृती आराखडा राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अपघाती मृत्यूंमध्ये ६ टक्के घट

बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात वाहनांची संख्या वाढत असतानाही जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत अपघाती मृत्यूंची संख्या ६ टक्क्यांनी कमी झाली आहे.

२०२५ मधील अपघाती मृत्यूंच्या आकडेवारीमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण ६० टक्के, तर पादचाऱ्यांचे प्रमाण २२ टक्के असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Web Title: Maharashtra road safety council pratap sarnaik orders modern technology golden hour trauma care ambulance system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • Accident
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
1

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
2

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
3

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

पालिकेच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा? रस्त्यावर गरम मॅस्टिक, पण बॅरिकेड्सचा पत्ता नाही; वसईत स्कूटीवरून घसरून माय-लेकी गंभीर जखमी
4

पालिकेच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा? रस्त्यावर गरम मॅस्टिक, पण बॅरिकेड्सचा पत्ता नाही; वसईत स्कूटीवरून घसरून माय-लेकी गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.