महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
Marathi Breaking news live updates : दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. माजी पंतप्रधानांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. इतिहासाच्या पानांवर 27 डिसेंबर बद्दल बोलायचे तर, प्रसिद्ध उर्दू-फारसी कवी मिर्झा गालिब यांचा जन्म 1797 मध्ये या दिवशी झाला. 1911 मध्ये कलकत्ता (आता कोलकाता) अधिवेशनात जन गण मन हे पहिल्यांदा गायले गेले. 1934 मध्ये पर्शियाच्या शाहने पर्शियाचे नाव बदलून इराण करण्याची घोषणा केली होती. बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा जन्म 1965 मध्ये झाला होता. 1968 मध्ये, चंद्राभोवती फिरणारे पहिले मानव मिशन अपोलो-8 पॅसिफिक महासागरात उतरले होते. 1979 मध्ये या दिवशी सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता. 2007 मध्ये या दिवशी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची रावळपिंडीजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
27 Dec 2024 08:41 PM (IST)
गेले तीन दिवस मंत्री दत्तात्रय भरणे भरणे यांचा कोणताही संपर्क होत नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यांचा फोन स्विच ऑफ. भरणे यांनी अद्याप मंत्री पदाचा पदभार देखील स्वीकारला नाही.मनासारखी खाते न मिळाल्याने भरणे नाराज असल्याची इंदापूर तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा आहे.
27 Dec 2024 04:19 PM (IST)
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज लातूरच्या रेणापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मोर्चाला संतोष देशमुख यांच्या मुलीने संबोधित केलं. यावेळी ती भावूक झाली होती.
27 Dec 2024 04:09 PM (IST)
बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. अतिशय विकृत पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटत असून उद्या सर्वपक्षिय मोर्चा निघणार आहे. दरम्यान संतोष देशमुख यांच्या मुलीने कुटुंबाला साथ द्या असं म्हणत भावनिक साद घातली आहे.
27 Dec 2024 02:58 PM (IST)
भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरूवारी (26 डिसेंबर) रात्री अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील एम्स रुग्णालायता त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ.मनमोहन सिंग हे केवळ भारताचे पंतप्रधानच नव्हते, तर त्यांनी अर्थमंत्री म्हणूनही काम केले होते. 90 च्या दशकात जेव्हा देश मोठ्या आर्थिक संकटात होता, तेव्हा अर्थमंत्री म्हणून त्यांनी असे मोठे निर्णय घेतले ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले, आर्थिक उदारीकरणात त्यांचे विशेष योगदान होते. पण त्यांच्या निधनाच्या निमित्ताने आता त्यांच्या पीएचडीही चर्चेत आली आहे.
27 Dec 2024 02:30 PM (IST)
शिक्षणात अव्वल
1952 : पंजाब विद्यापीठ, चंदीगडमधून एमए (अर्थशास्त्र) मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.
1954 : सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिज येथे उत्कृष्ट कामगिरीसाठी राइट्स पारितोषिक मिळाले.
1955 आणि 1957 : केंब्रिज विद्यापीठाचे रेन्सबरी स्कॉलर.
1957 : DPhil (ऑक्सफर्ड), DLitt (सन्मान कारण); भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेवर पीएचडी प्रबंध.
व्यवसाय आणि शिकवण्याचा अनुभव
➤प्राध्यापक (वरिष्ठ व्याख्याता, अर्थशास्त्र), 1957-59
➤ वाचक, अर्थशास्त्र, 1959-63
➤ प्राध्यापक, अर्थशास्त्र, पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 1963-65
➤प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय व्यापार, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठ, १९६९-७१
➤ मानद प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली
➤प्राध्यापक आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली विद्यापीठ, 1996 आणि नागरी सेवक
27 Dec 2024 02:09 PM (IST)
भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डय मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच महत्त्वपूर्ण मागणी देखील केली आहे. संजय सिंह म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ज्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले, ते भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नचे पात्र आहेत. भारताच्या प्रगतीसाठी 10 वर्षे काम करणाऱ्या महान अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधानांचे निधन ही निश्चितच दुःखद बातमी आणि मोठे नुकसान आहे. पक्षाच्या वतीने मी शोक व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो.” अशा शब्दांत आप नेते संजय सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच आप नेते संजय सिंह यांनी मनमोहन सिंग यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.
27 Dec 2024 01:20 PM (IST)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या.
मंत्रिमंडळ बैठकीत मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोक ठराव मंजूर करण्यात आला.
27 Dec 2024 01:09 PM (IST)
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील स्वर्ग शेरी भागात सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. या परिसरात काही दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
27 Dec 2024 12:56 PM (IST)
मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, "मनमोहन सिंग यांनी देशसेवेत महत्त्वाचे योगदान दिले, पण आज ते आपल्यात नाहीत. मुंबईपासून त्यांचे आणि माझे नाते आहे. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा ते आरबीआयचे गव्हर्नर होते. त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था संकटात होती, तेव्हा त्यांनी स्वत: RBI गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे निर्णयही घेतले.
27 Dec 2024 12:46 PM (IST)
ईडीने सौरभ शर्माच्या भोपाळमधील नवीन लपलेल्या ठिकाणावर छापा टाकला आहे. ईडीच्या पथकाने अरेरा कॉलनीतील बंगला क्र. ई-7 वर छापा टाकला. सौरभ लवकरच नवीन बंगल्यात शिफ्ट होणार होता.
27 Dec 2024 12:01 PM (IST)
राजगुरुनगर मधील दोन चिमुकल्यांच्या हत्येच्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी पीडितांच्या कुटुंबियांनी आणि नागरिकांनी पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
27 Dec 2024 11:47 AM (IST)
मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ पीएम मोदींनी स्वमवत योजनेअंतर्गत आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम रद्द केला. आज दुपारी 12.30 वाजता या योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लोकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात येणार होते. हा मोठा देशव्यापी कार्यक्रम होता. त्यात कोट्यवधी लोक सहभागी होत होते आणि देशाच्या विविध भागातून मंत्री उपस्थित राहणार होते.
26 Dec 2024 09:03 PM (IST)
भारत जोडो यात्रेने कॉंग्रेसला नवसंजीवनी दिली. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं. राहुल गांधींनी दोन यात्रांमधून संपूर्ण देश पिंजून काढला होता. त्यांच्या या यात्रांना देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पुन्हा 26 जानेवारी पासून काँग्रेसकडून संविधान बचाओ यात्रा अर्थात ‘सेव्ह कॉन्स्टिट्युशन नॅशनल मार्च’ काढण्यात येणार असून हा कार्यक्रम वर्षभर चालणार आहे. कॉंग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे.