Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News today Live : ‘मित्रा’ संस्थेने दिशादर्शक काम करावे; CM फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Marathi breaking live marathi headlines update 28 Dec 2024: आज 28 डिसेंबर 2024 रोजी देश, परदेशात, राज्यस्तरावरील, शासकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 22, 2025 | 09:47 AM
महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आ (28 डिसेंबर) पार्थिवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. आज 28 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता त्यांचे पार्थिव AICC मुख्यालयात आणले जाईल आणि जनता आणि काँग्रेस कार्यकर्ते सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मनमोहन सिंग यांचा अंतिम प्रवास उद्या सकाळी 9.30 वाजता एआयसीसी मुख्यालय ते स्मशानभूमीपर्यंत होईल. राजस्थानमध्ये भजनलाल सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर रवाना होणार आहेत. महाकुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम योगी प्रयागराजला पोहोचणार आहेत.

The liveblog has ended.
  • 28 Dec 2024 09:54 PM (IST)

    28 Dec 2024 09:54 PM (IST)

    ‘मित्रा’ संस्थेने दिशादर्शक काम करावे; CM फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश

    देशातील अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्यासाठी वित्तीय सुधारणा, खनिकर्म, गटशेती, सौरऊर्जा प्रकल्प, जैव इंधन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी यासारख्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेने दिशादर्शक काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनची (मित्रा) बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

  • 28 Dec 2024 09:14 PM (IST)

    28 Dec 2024 09:14 PM (IST)

    ऐन थंडीत पावसाने लावली हजेरी; पुणेकरांची उडाली तारांबळ

    पुणे शहरात गेले काही दिवस थंडीचे हवामान पाहायला मिळत होते. मात्र गेले दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली असुन, पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात जिल्ह्यात काही भागांत पावसाने हजेरी लावली. पावसाने शिडकावा केला असला तरी राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तरंबल उडलेली पाहायला मिळाली.

  • 28 Dec 2024 08:43 PM (IST)

    28 Dec 2024 08:43 PM (IST)

    100 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतील 6 शेअर्स

    आजकाल जवळपास प्रत्येक तरुण शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचे स्वप्न पाहत असतो. पण प्रत्येकाचा खिसा प्रचंड प्रमाणात गुंतवण्याइतका भरलेला नसतो. याशिवाय बाजारातील परिस्थिती लक्षात घेता पैसे बुडण्याची भीतीही आहे. अशा परिस्थितीत नवीन गुंतवणूकदार अशा शेअर्सचा शोध घेतात की ज्यातून त्यांना कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकेल. आज, तज्ज्ञांचा हवाला देत, आम्ही तुम्हाला अशा 5 स्टॉक्सबद्दल सांगत आहोत.

  • 28 Dec 2024 08:06 PM (IST)

    28 Dec 2024 08:06 PM (IST)

    नववर्षात कार खरेदी करण्याचा प्लॅन आहे? ‘या’ 6 गोष्टी ठेवा लक्षात

    आपल्या स्वतःच्या कमाईवर आपल्या हक्काची कार विकत घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. आता 2024 संपायला फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. कित्येक जणांनी तर आपले बजेट आणि आपली आवडती कार आधीच सिलेक्ट करून ठेवली असेल. फक्त आता नववर्षाची कित्येक जण वाट पाहताना दिसत आहे.

    येणाऱ्या नववर्षाची सुरुवात अनेक जण नवीन कार खरेदी करून करत असतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने घरात नवीन कार आल्याने प्रत्येकजण आनंदी असतात, पण या काळात तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जेव्हा तुम्ही नवीन कार खरेदी करता तेव्हा कार इंश्युरन्स पॉलिसी आणि इतर अनेक गोष्टी घेणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन आज आपण नवीन कार खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याबद्दल जाणून घेऊयात.

  • 28 Dec 2024 07:36 PM (IST)

    28 Dec 2024 07:36 PM (IST)

    कसे होते लव्ह अ‍ॅट फर्स्ट? समजून घ्या शरीरात लपलेले प्रेमाचे रहस्य

    ऑक्सिटोसिन, ज्याला ‘लव्ह हार्मोन’ म्हणून ओळखले जाते, मानवांमध्ये भावनिक आणि सामाजिक बंध निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हे संप्रेरक एखाद्या व्यक्तीकडे डोळ्यांद्वारे पाहून आसक्ती वाढविण्यात, विश्वास निर्माण करण्यास आणि दयाळूपणा निर्माण करण्यास मदत करते. हे केवळ नातेसंबंध मजबूत करत नाही तर तणाव कमी करण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. टोकियो युनिव्हर्सिटीच्या संशोधनात स्मरणशक्ती सुधारण्यासाठीही ते उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.

  • 28 Dec 2024 07:05 PM (IST)

    28 Dec 2024 07:05 PM (IST)

    अंजली दमानियांच्या दाव्यावर मंत्री संजय शिरसाठांची प्रतिक्रीया; म्हणाले, बोगस…

    अंजली दमानिया या बोगस आरोप करत असतात त्यांच्याकडे जर एवढी माहिती असेल तर त्यांनी ती पोलीस अधीक्षकांना दिली पाहिजे. असे आरोप करणाऱ्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत असतात. ज्यांची हत्या झाली आहे त्यांना न्याय देण्यासाठी शासन सक्षम असून, त्यादृष्टीने तपास पुढे चालला आहे. असं यावेळी शिरसाठ म्हणाले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आज पुणे दौऱ्यावर होते.

  • 28 Dec 2024 06:55 PM (IST)

    28 Dec 2024 06:55 PM (IST)

    प्रयागराजमध्ये पुलाचा टॉवर कोसळल्याने अपघात, पाच कामगार जखमी

    विद्युत तारा काढताना पुलाचा टॉवर कोसळल्याने संगम शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकूण पाच मजूर जखमी झाले असून, दोन मजुरांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर तीन गंभीर जखमींवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या एसआरएन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सराई इनायत पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत आहे. डीसीपी गंगानगर कुलदीप सिंह गुणवत यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पुलाच्या टॉवरची वायर मशीनच्या साहाय्याने खेचली जात असताना अचानक टॉवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि खांबांमध्ये गाडलेल्या मजुरांची सुटका करण्यात आली.

  • 28 Dec 2024 06:14 PM (IST)

    28 Dec 2024 06:14 PM (IST)

    यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी पोहोचले

    यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत पोहोचले आहेत. जिथे ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. असे मानले जात आहे की सीएम योगी इतर अनेक बड्या नेत्यांना भेटू शकतात.

  • 28 Dec 2024 05:06 PM (IST)

    28 Dec 2024 05:06 PM (IST)

    राजस्थान सरकारने गेहलोत राजवटीत निर्माण केलेले 9 जिल्हे आणि 3 विभाग रद्द

    राजस्थानच्या भजनलाल सरकारने मागील सरकारने निर्माण केलेल्या 20 नवीन जिल्ह्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन विभाग रद्द करताना 20 पैकी 8 जिल्हे जसेच्या तसे ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेहलोत राजवटीत निर्माण झालेले 9 जिल्हे आणि 3 विभाग सरकारने रद्द केले आहेत.

  • 28 Dec 2024 04:55 PM (IST)

    28 Dec 2024 04:55 PM (IST)

    केंद्र सरकारने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान केला : राहुल गांधी

    भारत मातेचे महान सुपुत्र आणि शीख समाजाचे पहिले पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा आज निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करून विद्यमान सरकारने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे, अशी पोस्ट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर केली आहे. आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंतिम संस्कार अधिकृत समाधीत केले गेले जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली अर्पण करता येईल.

  • 28 Dec 2024 03:46 PM (IST)

    28 Dec 2024 03:46 PM (IST)

    तुम्ही नाव घेत नाही, मी लढत नाही - मनोज जरांगे पाटील

    पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणे काही मोठी गोष्ट नाही. संतोष भैय्या यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण मागे हटायचे नाही. आपल्या लेकारला न्याय मिळाला पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. तुम्ही नाव घेत नाही. मी लढत नाही. तुम्हाला काय माहीत आहे का मी लढत नाही. मीच एकट्याने का करावे. सुरेश धस अण्णाच एकटे काफी आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मी काय करतो, यापेक्षा समाजाने काय ठरवले, हे महत्वाचे आहे. तेच मी करणार नाही. माझ्या जातीवर कोणी अन्याय केला तर मी त्याला सोडत नाही, मग तो कोणीही असो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

  • 28 Dec 2024 03:07 PM (IST)

    28 Dec 2024 03:07 PM (IST)

    सीबीआयने वरिष्ठ अधीक्षक संजय शर्मा लाच घेताना पकडले

    सीबीआयने आज सापळा रचून आरोपी वरिष्ठ अधीक्षक संजय शर्मा याला तक्रारदाराकडून 45,000 रुपयांची लाच मागताना रंगेहात पकडले. आज, संजय शर्मा, वरिष्ठ अधीक्षक (विक्री), मदर डेअरी, दिल्ली, यांच्याविरुद्ध तक्रारदाराकडून वितरकत्व रद्द न करण्यासाठी ६०,००० रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयने ही माहिती दिली आहे.

  • 28 Dec 2024 02:30 PM (IST)

    28 Dec 2024 02:30 PM (IST)

    कोणत्याही मुद्द्यावर निर्णय घेण्यास सक्षम नाहीत… BPSC मुद्द्यावर तेजस्वी म्हणाले...,

    बीपीएससी उमेदवारांच्या निषेधावर, आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले, “येथे कोणतेही सरकार नाही आणि जे सरकार आहे ते जागरूक नाही. मुख्यमंत्री आता निर्णय घेण्यास सक्षम नाहीत आणि कोणत्याही विषयावर निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. मुख्यमंत्री आमच्या पत्रालाही उत्तर देत नाहीत, पेपर फुटला असेल तर सर्वांचे पेपर रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. ते एका केंद्राचे पेपर रद्द करतात, पण इतर केंद्रांचे पेपर का रद्द करत नाहीत? आमचे सरकार होते तेव्हा तरुण आनंदी होते, पण आज त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. येथे प्रशासकीय अराजकता पसरली आहे.

  • 28 Dec 2024 02:28 PM (IST)

    28 Dec 2024 02:28 PM (IST)

    लैंगिक छळ प्रकरण: तामिळनाडूचे राज्यपाल अण्णा विद्यापीठात पोहोचले

    लैंगिक छळाच्या कथित घटनेची पाहणी आणि माहिती गोळा करण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी अण्णा विद्यापीठात पोहोचले.

  • 28 Dec 2024 01:23 PM (IST)

    28 Dec 2024 01:23 PM (IST)

    बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते मोर्चात सहभागी, हजारो लोक रस्त्यावर

    बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरले आहे. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चा हजारो लोक सहभागी झाले आहे.

  • 28 Dec 2024 01:21 PM (IST)

    28 Dec 2024 01:21 PM (IST)

    ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन

    ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. किरण ठाकुर यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. किरण ठाकूर यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार असल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.

  • 28 Dec 2024 12:45 PM (IST)

    28 Dec 2024 12:45 PM (IST)

    अनाधिकृत वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना ATS ने घेतले ताब्यात

    जालन्याच्या भोकरदन मधील अन्वा येथून स्टोन क्रेशर वर कामाला असणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलंय.हुमायून कबीर अली अहमद, माणिक खान जन्नोदिन खान, इमदाद हुसेन मोहम्मद अली हुसेन अशी या तीन तरुणांची नावे आहेत.

  • 28 Dec 2024 12:10 PM (IST)

    28 Dec 2024 12:10 PM (IST)

    परभणीत वंशाच्या दिव्यासाठी पतीनं पत्नीला जिवंत जाळलं

    पहिल्या दोन मुली पण तिसरीही मुलगी झाल्याने पतीनं पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळलं, ही घटना परभणीत घडली असून घटनेनंतर उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.

  • 28 Dec 2024 12:08 PM (IST)

    28 Dec 2024 12:08 PM (IST)

    छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने 7 ठिकाणी छापे

    छत्तीसगड दारू घोटाळ्यात ईडीने 7 ठिकाणी छापे टाकले आहेत. कावासी लखमाच्या घरासह रायपूरमध्ये 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. कावासी लखमा 2020 ते 2022 या काळात छत्तीसगडचे उत्पादन शुल्क मंत्री असताना त्यांना गुन्ह्यातून मिळणारी रक्कम म्हणून प्रत्येक महिन्याला 2 कोटी रुपये दिले जात होते, असा आरोप आहे. या घोटाळ्यात माजी मंत्र्यांच्या घरावर छापा टाकण्याची ही दुसरी वेळ आहे.

  • 28 Dec 2024 11:52 AM (IST)

    28 Dec 2024 11:52 AM (IST)

    दिल्लीतील नजफगड कारखान्याला आग, ४ कामगारांचा होरपळून मृत्यू

    दिल्लीतील नजफगढ येथील नांगली सकरावती औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात सकाळी ८ वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग आता नियंत्रणात आली आहे. यात चार कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली अग्निशमन सेवेने ही माहिती दिली आहे.

  • 28 Dec 2024 11:42 AM (IST)

    28 Dec 2024 11:42 AM (IST)

    बीडमध्ये कडकडीत बंद, 400 पोलीस तैनात

    सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आज बीडमध्ये मूक मोर्चा. सकाळपासूनच सर्व बाजारपेठा बंद. शाळा, महाविद्यालये देखील बंद. अत्यावश्यक सेवा वगळता बीड कडकडीत बंद राहणार. शहरात येणारी सर्व वाहतुक वळवली. मूक मोर्चासाठी 400 पोलीस कर्मचारी तैनात. 4 dysp, एक अपर पोलीस अधीक्षक देखरेखीला. राज्य सुरक्षा बलाच्या ही दोन तुकड्या. आरसीपीच्या 6 प्लाटून तैनात.

  • 28 Dec 2024 11:42 AM (IST)

    28 Dec 2024 11:42 AM (IST)

    प्रकाश सोळंके यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

    आज संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस पूर्ण झाले आहेत. देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देऊ अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली. परंतु दुर्दैवाने दोन्ही घटनेतील आरोपी अद्याप अटक नाही. याबद्दल सर्वसामान्य माणसात आक्रोश आहे. या मोर्चाची दखल सरकारने घ्यावी. अन्यथा पुढील दिशा आम्ही वेळोवेळी ठरवू, असा इशारा प्रकाश सोळंके यांनी दिला.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events 28 dec 2024 on manmohan singh funeral live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 11:41 AM

Topics:  

  • maharashtra
  • Manmohan singh
  • narendra modi

संबंधित बातम्या

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
1

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

कायद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांवर निशाणा; सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्ती विधेयकावर जोरदार ‘हंगामा’
2

कायद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांवर निशाणा; सत्ताधाऱ्यांच्या दुरुस्ती विधेयकावर जोरदार ‘हंगामा’

PM असो वा CM मुख्यमंत्री…, भ्रष्टाचारी हा तुरुंगातच जाणार, पंतप्रधान मुख्यमंत्री विधेयकावर मोदींचा महत्त्वाचा निर्णय
3

PM असो वा CM मुख्यमंत्री…, भ्रष्टाचारी हा तुरुंगातच जाणार, पंतप्रधान मुख्यमंत्री विधेयकावर मोदींचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
4

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.