Meghalaya government minister Alexander Lalu Hek demands apology from Raghuvanshi family
इंदूर : देशामध्ये सध्या सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. हनिमून गेलेल्या या जोडप्यातील राजा रघुवंशीचा मृतदेह आढळला होता. तर सोनम ही बेपत्ता असल्याचे बोलले जात होते. मात्र हनिमूनसाठी इंदूरहून मेघालयला गेलेल्या राजा रघुवंशीचा खून त्याच्या पत्नी सोनमनेच केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सोनम आणि तिच्या प्रियकर राज कुशवाहा यांनीच राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शिलाँगसारख्या दूरच्या ठिकाणी, सुमारे २,००० किमी अंतरावर, सोनमने हा गुन्हा केला. या प्रकरणानंतर आता मेघालयच्या मंत्र्यांनी अजब दावा केला आहे.
मेघालय पोलिसांनी अवघ्या काही दिवसांमध्ये या प्रकरणाचा छडा लावला आहे. फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्डस व आरोपीची कबुली याच्या मदतीने पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. ‘ऑपरेशन हनीमून’ या नावाने एक पोलीस पथक स्थापन करून पोलिसांनी हे गुंतागुंतीचं प्रकरण जवळपास सोडवले आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांत, १६ मे रोजी सोनमने राज कुशवाहासोबत मिळून हा मर्डर प्लॅन केला. राजाला हनिमूनसाठी शिलाँगला जाण्यासाठी तिने राजाला तयार केले. याचदरम्यान, गुवाहाटीमध्ये आधीच तीन सुपारीबाज आधीच तैनात करण्यात आले होते. त्यांनी लहान कुऱ्हाड ऑनलाइन ऑर्डर केली होती. फोटोशूटच्या बहाण्याने टेकडीवर घेऊन जात त्याचा मर्डर केला. यामुळे मेघालयचे नाव खराब झाले असल्याचा दावा मेघालयच्या मंत्र्यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. सात दिवसांत मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल त्यांनी आधी पोलिसांची पाठ थोपटली. तसेच मेघालय राज्याची बदनामी केल्याप्रकरणी सोनम व राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी माफी मागावी अशी मागणी हेक यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी अजब दावा केला आहे. ते म्हणाले, “ईशान भारतातील सुंदर अशा मेघालयमध्ये इंदूरमधील * ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची बरीच चर्चा चालू आहे. मात्र, चर्चेची कारणं चुकीची आहेत. या प्रकरणात मेघालय पोलिसांवर टीका झाली. मात्र, त्यांनी अवघ्या सात दिवसांत हा गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. तत्पूर्वी राजा व सोनम बेपत्ता झाल्यानंतर अनेकांनी ईशान्य भारताची, मेघायल राज्याची बदनामी केली. राजा व सोनमच्या कुटुंबियांनी आमच्या राज्याची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी आता माफी मागायला हवी. राजा व सोनमच्या कुटुंबियांनी मेघालयची माफी मागितली नाही तर आमचं राज्य सरकार दोन्ही कुटुंबांविरोधात मानहानीचा खटला दाखल करेल, असा मोठा दावा अलेक्झांडर लालू हेक यांनी केला आहे.