Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : जिद्द आणि कष्टातूनच उद्योजक घडतात…: ‘थर्माकोल मॅन’ रामदास माने यांचे प्रतिपादन

वाई येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास माने बोलत होते.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 03, 2026 | 12:12 PM
annual prize distribution ceremony of Kisan Veer Junior College, Wai for the academic year 2025-26

annual prize distribution ceremony of Kisan Veer Junior College, Wai for the academic year 2025-26

Follow Us
Close
Follow Us:

Satara News : वाई: “आजची नवी मुलं म्हणतात की मला नवा उद्योग करायचा आहे, भांडवल आणि जागा द्या. पण खरं तर उद्योग करायला केवळ पैसा किंवा जागा लागत नाही, तर लागते ती प्रबळ जिद्द! निर्मिती ही सहजपणे होत नाही, ती संघर्ष आणि कष्टातूनच होते. या संघर्षाचा हसतखेळत सामना करण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्यास ते निश्चितपणे यशस्वी उद्योजक बनून समाजाचे प्रश्न सोडवू शकतील,” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक आणि ‘थर्माकोल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे रामदास माने यांनी केले.

वाई येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचा सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास माने बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले होते. यावेळी पुणे सिनियर केंब्रिज कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत कुलकर्णी, सी.ए. उदयभाई गुजर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य डॉ. अर्जुन जाधव व पर्यवेक्षक श्री. श्रावण पवार व्यासपीठावर उपस्थित होते.

हे देखील वाचा : जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शिक्षण, साहित्य अन् समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

यावेळी बोलताना डॉ. प्रशांत कुलकर्णी म्हणाले की, बदलत्या जगात नोकऱ्यांचे स्वरूप जरी अनिश्चित असले, तरी दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवून काम करणारी माणसेच टिकून राहणार आहेत. याबाबतीत रामदास माने हे विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत आदर्श आहेत. अध्यक्षीय भाषणात मदनदादा भोसले यांनी शिक्षण आणि शहाणपण यातील फरक स्पष्ट केला. “विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षित न होता ‘कळते’ होणे महत्त्वाचे आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि धाडसातूनच प्रगती साध्य होते. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्तेसोबतच चारित्र्य, शिस्त आणि मूल्यांची जोड द्या,” असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तत्पूर्वी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत असतानाच येथे ए.आय. (AI), मशरूम निर्मिती, स्पिरुलिना आणि फोटोग्राफी यांसारखे कोर्सेस सुरू करून उद्योजकतेचे धडे दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. उपप्राचार्य डॉ. अर्जुन जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.पर्यवेक्षक व कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री. श्रावण पवार यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक अहवाल, तर क्रीडा शिक्षक सचिन चव्हाण यांनी क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीचा अहवाल सादर केला.

हे देखील वाचा : राजकीय धुलवड! ठाकरे गटाला मोठा धक्का; उन्मेष पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश

या मार्गदर्शनपर व्याख्यानानंतर महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील पारितोषिके स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नयना भोसले, श्रीमती स्वप्नगंधा जाधव व श्री. सुमित वाघमारे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षक प्रतिनिधी सौ. शीतल माने यांनी मानले, तर कु. सलोनी सरतापे आणि गौरव वायदंडे यांनी पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वाई नगरपालिकेतील विविध समित्यांचे सभापती, पुरस्कृत नगरसेवक तसेच संस्थेचे संचालक, सदस्य तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील वाईतील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी मान्यवर उपस्थित होते.शिस्तबद्धता आणि नव्या उमेदीचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील असा ठरला.

Web Title: Annual prize distribution ceremony of kisan veer junior college wai for the academic year 2025 26

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • daily news
  • Satara News
  • Vai News

संबंधित बातम्या

AI अ‍ॅपसाठी कृषी विभाग सज्ज; शेतकऱ्यांना दिली जात आहे महत्त्वाची माहिती
1

AI अ‍ॅपसाठी कृषी विभाग सज्ज; शेतकऱ्यांना दिली जात आहे महत्त्वाची माहिती

Satara News : बामणोली विभागातील शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध रिपाई आक्रमक
2

Satara News : बामणोली विभागातील शिक्षणाचा खेळखंडोबा; शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध रिपाई आक्रमक

Nanded News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जलसंपदा विभागात १० हजार पदांवर भरती
3

Nanded News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जलसंपदा विभागात १० हजार पदांवर भरती

दुर्गम भागात कायदेशीर हक्कांच्या जाणीव -जागृतीसाठी शिबिर; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत सिंह राजा भोसले उपस्थित
4

दुर्गम भागात कायदेशीर हक्कांच्या जाणीव -जागृतीसाठी शिबिर; मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत सिंह राजा भोसले उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.