Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घाबरू नका, तक्रार करा, सुरक्षित राहा’ मोहीम ५ भारतीय भाषांमध्ये होणार सुरू

मेटा आणि राष्ट्रीय महिला आयोगाने आज फरहान अख्‍तर यांची संस्‍था मर्दसोबत सहयोगाने महिलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी तक्रार मोहिम “घाबरू नका, तक्रार करा, सुरक्षित राहा”च्‍या शुभारंभाची घोषणा केली. ही मोहीम ऑनलाइन छळ, अयोग्य साहित्य किंवा वर्तणूक यांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी उपलब्ध साधने आणि स्त्रोत यांच्याबाबत जागरूकता आणि ज्ञान वाढवण्‍यावर लक्ष केंद्रित करेल.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 17, 2022 | 08:02 PM
‘घाबरू नका, तक्रार करा, सुरक्षित राहा’ मोहीम ५ भारतीय भाषांमध्ये होणार सुरू
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: इंग्लिश आणि पाच भारतीय भाषा – हिंदी, बंगाली, मराठी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये सुरू केलेल्या ‘घाबरू नका, तक्रार करा, सुरक्षित राहा’ या मोहिमेतून वापरकर्त्यांना आक्षेपार्ह वाटणारे साहित्य पुढे पाठवण्याऐवजी त्याची तक्रार करण्याबाबत जागरूकता निर्माण केली जाईल.

वापरकर्त्यांसाठी सुरक्षित इंटरनेट निर्माण करण्याचे प्रयत्न आणि उपक्रम यांच्याबाबत बोलताना फेसबुक इंडिया (मेटा)च्या धोरण उपक्रम आणि आऊटरीचच्या प्रमुख मधू सिंग सिरोही म्हणाल्या की, “संशोधनानुसार महिला डिजिटलदृष्ट्या सक्षमीकृत असल्यास आर्थिक विकासात जास्त योगदान देतात आणि त्यासाठी सुरक्षित असलेल्या व वाढ तसेच प्रभावाला चालना देणाऱ्या इंटरनेटच्या निर्मितीची गरज आहे. मेटामध्ये आम्ही महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक इंटरनेट आणणाऱ्या साधने आणि स्त्रोतांची उभारणी करण्यावर भर दिला आहे. ‘घाबरू नका, तक्रार करा, सुरक्षित राहा’ या मोहिमेद्वारे आम्हाला खात्री आहे की, महिलांविरूद्ध ऑनलाइन दिसून येणारे धोके नोंदवण्यासाठी आम्ही लोकांना प्रोत्साहित करू शकू आणि आमच्यासोबत ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर महिलांसाठी सक्षमीकरण अनुभव देण्यासाठी जोडले जातील.”

भारतातील आघाडीच्या सीएसओंसोबत चर्चा करून बांधण्यात आलेल्या ‘घाबरू नका, तक्रार करा, सुरक्षित राहा’ मोहिमेचे उद्दिष्ट सध्या असलेल्या गैरसमजूती दूर करण्याचेही आहे जसे, “मी तक्रार केल्यास काहीही होणार नाही” किंवा “मी तक्रार केल्यास ती निनावी राहणार नाही.” तसेच ही मोहीम वापरकर्त्यांना हे समजून घेण्यास मदत करेल की, ते एखाद्या साहित्याची तक्रार करता तेव्हा त्यांच्याकडे आमच्या अॅप्सवर- फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर त्यांच्या अनुभवाचे नियंत्रण असते.

मेटासोबत आपल्या भागीदारीबाबत आणि मोहिमेच्या अनावरणाबाबत बोलताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) रेखा शर्मा म्हणाल्या की, “मेटा कायमच राष्ट्रीय महिला आयोगासाठी (एनसीड्ब्ल्यू) डिजिटल साक्षरता उपक्रम चालवण्यासाठी दीर्घकालीन भागीदार ठरली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त महिलांना इंटरनेटवर सुरक्षित राहताना या ऑनलाइन प्रवासाचा भाग होणे शक्य झाले आहे. यात सायबरबुलिंग, सायबरस्टॉकिंग आणि आर्थिक घोटाळे यांच्यासारख्या विषयांशी संबंधित ऑनलाइन स्त्रोत आणि महिलांना उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्त्रोत आणि तक्रार निवारण यंत्रणांचा प्रभावशाली वापर यांचा समावेश आहे. ऑनलाइन व्यासपीठांवर महिलांच्या जास्त सुरक्षेसाठी वापरकर्त्यांना संवेदनशील बनवणे गरजेचे आहे. त्यांनी एखाद्या अडचणीच्या साहित्याची तक्रार कशी नोंदवावी हे त्यांना कळणे गरजेचे आहे. आज आम्ही या मोहिमेच्या अनावरणाद्वारे जास्तीत-जास्त वापरकर्त्यांनी पुढे येऊन महिलांना रोजच्या रोज सामोरे जावे लागत असलेला ऑनलाइन छळ थांबवण्यासाठी मदत करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत.”

मोहिमेसोबतच्या भागीदारीबाबत बोलताना, फरहान अख्तर, अभिनेता, संचालक यूएन विमेन गुडविल एम्बेसेडर साऊथ एशिया आणि संस्थापक मर्द उपक्रम (मेन अगेन्स्ट रेप अँड डिस्क्रिमिनेशन) म्हणाले की, “मर्दमध्ये आम्ही लिंग समानता निश्चित करणे आणि इंटरनेटच्या लोकशाहीकरणावर विश्वास ठेवतो. त्यामुळे सर्व वापरकर्त्यांचा आत्मसन्मान राखला जाईल. ऑनलाइन छळाविरूद्ध आवाज उठवणे आणि अशा प्रकारच्या साहित्याची तक्रार नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या छळांचा सामना करणे शक्य होईल. आम्हाला मेटा आणि एनसीडब्ल्यूसोबत भागीदारी करून जास्तीत-जास्त लोकांसाठी सुरक्षित ऑनलाइन अनुभव देण्यासाठी प्रयत्न करताना अभिमान वाटतो.”

मेटाने कायमच महिलांसाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक इंटरनेटच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले आहेत. मागील वर्षी मेटाने स्टॉपएनसीआयआय.ओआरजी स्थापन केली. त्यात जगभरातील महिलांना एकत्र येऊन संमती नसलेली इंटिमेट छायाचित्रे (एनसीआयआय)चा प्रसार थांबवण्यासाठी सबल करण्यात आले होते. मेटाने इंग्लिश आणि १२ भारतीय भाषांमध्ये महिलांसाठी सेफ्टी हब सुरू केले. त्यात प्लॅटफॉर्मवर काम करत असताना महिलांना सर्व सुरक्षा स्त्रोत मिळू शकतील. त्यात महिला नेत्या, पत्रकार आणि छळातून वाचलेल्या बळींसाठी विशिष्ट स्त्रोत आहेत. त्याचबरोबर त्यात व्हिडिओ ऑन डिमांड सुरक्षा प्रशिक्षणही समाविष्ट आहे आणि ते अभ्यागतांना विविध भाषांमध्ये असलेल्या लाइव्ह सुरक्षा प्रशिक्षणासाठीही नोंदणी करण्याची परवानगी देते.

Web Title: Meta and national commission for women collaborate with farhan akhtars sanstha mard to launch a grievance campaign for womens safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2022 | 08:02 PM

Topics:  

  • Farhan Akhtar
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.