धक्कादायक!अंगणवाड्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुले कुपोषित, रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर
देशातील १३ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यातील एकूण ६३ जिल्ह्यांमधील अंगणवाड्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुले कुपोषित असल्याचं आढळून आले आहे. त्यापैकी ३४ जिल्हे एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. १९९ जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांच्या दरम्यान आहे. संसदेत सादर केलेल्या कागदपत्रांच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या जून २०२५ च्या न्यूट्रिशन ट्रॅकरच्या आकडेवारीवरून हे उघड झाले आहे. न्यूट्रिशन ट्रॅकर ही एक डिजिटल प्रणाली आहे जी मुले आणि गर्भवती महिलांच्या पोषणाशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी, रेकॉर्ड करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी वापरली जाते. त्याचा उद्देश योग्य पोषण वेळेवर दिले जात आहे की नाही याची खात्री करणे आहे, जेणेकरून कुपोषण रोखता येईल.
श्रावणातील उपवासाच्या दिवशी शरीरात ऊर्जा टिकवून राहण्यासाठी झटपट बनवा बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक
महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या मते, ० ते ६ वर्षे वयोगटातील ८.१९ कोटी मुलांपैकी ३५.९१ टक्के मुले कुपोषित आहेत आणि १६.५ टक्के मुले कमी वजनाची आहेत. पाच वर्षांखालील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण आणखी जास्त म्हणजे ३७.०७ टक्के आहे. वजन कमी होणे ही देखील तितकीच गंभीर बाब आहे. अलिकडेच लोकसभेत महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर म्हणाल्या क पोषण हा केवळ अन्नाशी संबंधित मुद्दा नाही त त्यासोबत स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि शिक्षण देखील महत्त्वाचे आहे. कुपोषणाचा सामन करण्यासाठी बहु-क्षेत्रीय प्रयत्न आवश्यक आहेत.
पुद्दुचेरामध्ये कुपोषणाचे – प्रमाण सर्वाधिक
– कर्नाटकमध्ये रायचूर (५२.७६%) आणि – बागलकोट (५१.६१%), राजस्थानमध्ये सालुंबर – (५२.९५%), गुजरातमध्ये नर्मदा (५०.७१%) – हे देखील उच्च कुपोषणाचे प्रमाण असलेले जिल्हे – आहेत. केंद्रशासित प्रदेशांमध्ये, माहे (पुड्डुचेरी) – मध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक (५७.३८%) – असल्याची माहिती आहे.