MP Rahul Gandhi on Congress bjp Activists beaten up in bihar elections 2025
पटना : बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा सुरु आहे. मात्र सध्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. दरभंगा येथील व्यासपीठावरून एका काँग्रेस कार्यकर्त्याने पंतप्रधान मोदींवर अश्लील टिप्पणी केली. यावरुन बिहारमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. यामुळे भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून भिडले आहेत. पटनामधील कॉंग्रेस कार्यालयामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज भाजप कार्यकर्त्यांनी पटनामधील सदाकत आश्रमावर हल्ला केला, ते राज्य काँग्रेस कार्यालय आहे. यादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये कार्यकर्ते एकमेकांवर जीवघेणा हल्ला करत होते. झेंड्याच्या काठ्यांनी हाणामारी करत असून याचे फोटो व्हायरल झाले आहे. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ला आणि मारहाणीवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, सत्य आणि अहिंसेच्या पुढे… असत्य आणि हिंसाचार टिकू शकत नाहीत. तुम्हाला हवे तितके मारा आणि तोडा – आम्ही सत्य आणि संविधानाचे रक्षण करत राहू. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ध्वजाच्या काठ्यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष
भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमधील संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाजप कार्यकर्ते आणि नेते सदाकत आश्रमासमोर आणि आश्रमात वस्तूंची तोडफोड करताना दिसत आहेत. ते ध्वजाच्या काठ्यांचा वापर करून वाहनांची तोडफोड करत आहेत. काँग्रेस कार्यकर्तेही प्रत्युत्तर म्हणून ध्वजाच्या काठ्यांचा वापर करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी विटा आणि दगडफेकही करण्यात आली आहे. यावरुन आता बिहारचे राजकारण तापले आहे.