नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत दिल्लीतील एका महिलेने खळबळजनक दावा केला आहे. सानवी मालू असे या महिलेचे नाव आहे. सानवी ही दिल्लीस्थित व्यापारी आणि कुबेर ग्रुपचे संचालक विकास मालू यांची दुसरी पत्नी आहे. सानवीने दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून 15 कोटी रुपयांसाठी सतीश कौशिक यांची हत्या केल्याचं म्हटलं आहे.
सतीश कौशिक यांनी तिच्या पतीला (विकास मालू) 15 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप सान्वीने पत्रात केला आहे. सतीश त्यांचे पैसे परत मागत होते. त्यासाठी ते एकदा विकासशी दुबईत भेटले. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. विकासने कौशिकला पैसे परत करण्याचे आश्वासनही दिले होते.
सतीश कौशिश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
सानवीने पुढे लिहिले की, सतीश कौशिक विकासच्या फार्महाऊसमध्ये आजारी पडले. यादरम्यान विकासने त्याला (कौशिक) 15 कोटी परत करावे लागू नयेत म्हणून विष पाजले असण्याची शक्यता आहे. सान्वीने गेल्या वर्षी पती विकास मालूवर बलात्काराचा आरोप केला होता.
तथापि, पोलिसांनी सतीश कौशिकच्या मृत्यूमध्ये कोणताही कट असण्याची शक्यता नाकारली आहे आणि त्यांच्या शवविच्छेदन अहवालात अभिनेत्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर कौशिकच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतेही आरोप केलेले नाहीत.
फार्महाऊसमधून काही औषधे सापडली
दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी सतीश कौशिक ज्या फार्महाऊसमध्ये एका पार्टीत सहभागी झाले होते, तिथून काही औषधे जप्त केली आहेत. याच्या एका दिवसानंतर म्हणजेच ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. बुधवारी रात्री त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सांगितले की रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.