हरियाणात नायब सिंह सैनी होणार पुन्हा मुख्यमंत्री; 17 ऑक्टोबरला होणार शपथविधी
चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, आता नायब सिंह सैनी हे पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. सैनी यांच्या नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी 17 ऑक्टोबरला होणार आहे. नायब सिंह सैनी सकाळी 10 वाजता राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
हेदेखील वाचा : देशाला धोका असेल तर न डगमगता मोठी पावले उचलू… शस्त्रपूजनावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कोणाला इशारा?
पंचकुलामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. अशी माहिती मनोहर लाल खट्टर यांनी दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही मंत्र्यांचा शपथविधी सोहळा 17 ऑक्टोबर रोजी पंचकुलामध्ये होणार आहे. शपथविधी सोहळ्याला सुमारे 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजपाशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या नेत्यांना मिळू शकते मंत्रिमंडळात स्थान
कृष्ण लाल मिधा, श्रुती चौधरी, अनिल विज, अरविंद कुमार शर्मा, विपुल गोयल, निखिल मदान यांना हरियाणा सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. दरम्यान, या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या बड्या नेतृत्वासह पक्षाचे वरिष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली जात आहे.
हेदेखील वाचा : हरयाणात पराभवाला पक्षातील ‘त्या’ गोष्टी कारणीभूत; राहुल गांधींनी थेट मुळावरच घाव घातला…