Photo Credit- Social Media
नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. तर काँग्रेसने मात्र जिंकलेली बाजी हरली. निवडणुकीपूर्वी आलेल्या पोल्सनुसार, हरयाणात काँग्रेसचा विजय होत असल्याचे सांगितले जात होते. पण ऐन मतमोजणीच्या पहिल्या दुसऱ्या फेरीनंतर मात्र काँग्रेस मागे पडली आणि अखेर हरयाणात काँग्रेसचा पराभव झाला. पण हा पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये मोठा विजय मिळवूनही हरयाणातील पराभवामुळे काँग्रेसचा आनंद मावळून गेला.
हरयाणाच्या निकालानंतर गुरूवारी (10 ऑक्टोबर) लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत राहुल गांधींनी हरयाणाच्या पराभवाचा आढावा घेत नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तर बंडखोर अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे हरयाणात काँग्रेसचा पराभव झाला, असे अजय माकन यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: SCO शिखर परिषदेपूर्वी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण हल्ला झाला
जर सर्व सर्वेक्षण काँग्रेस जिंकत असल्याचे दाखवत होते, तर काँग्रेसचा पराभव का झाला, असा सवाल राहुल गांधींनी भर सभेत उपस्थित केला.त्याचवेळी कुमारी सैलजा, रणदीप सुरजेवाला किंवा भुपेंदर हुडा यांचे नाव न घेता,आमचे नेते पक्षाच्या हितापेक्षा स्वतःचे हिताकडेच लक्ष देतात, असे म्हणत पक्षांतर्गत गटबाजीवर राहुल गांधींनी निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, ” आपल्या पक्षातील नेते आधी स्वत:चा विचार आणि नंतर पक्षाचा विचार करतात, यामुळेच हरयाणात काँग्रेसचा परभव झाला.
संपूर्ण निवडणूक बुडवण्यामागे स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजणारे लोक आहेत. आणि पक्षाचे हित दुय्यम ठेवून काही नेत्यांच्या स्वार्थाने संपूर्ण निवडणुकीवर वर्चस्व गाजवले, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हरयाणाच्या या पराभवाची कारणे शोधण्यासाठी एक फॅक्ट फाईडिंग कमिटी स्थापन केली जाईल. त्यामुळे समितीने दिलेल्या अहवालानंतर राहुल गांधी काय कारवाई कऱणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: दसरा मेळावा गाजणार ! यंदा पहिल्यांदा धनंजय अन् पंकजा मुंडे येणार एकत्र
9 ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या निकालानंतर राहुल गांधींनी लिहिले की ते हरियाणाच्या अनपेक्षित निकालांचे विश्लेषण करत आहेत. अनेक जागांवरून येणाऱ्या तक्रारी निवडणूक आयोगाला कळवल्या जातील. अनेक जागांवर ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्यता असल्याची तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडेही केली आहे. मात्र हरियाणात काँग्रेसमध्येच वेगळी हेराफेरी सुरू असल्याचा आरोप झाला आहे. गटबाजी, तळ ठोकणे, स्वतःचे ढोल बडवणे, गलथान कारभार, बंडखोरांना स्वबळावर उभे करणे, युती न करणे, प्रभारींचे फोन न उचलणे, प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याऐवजी लढाईत व्यस्त राहणे, नेत्यांना कोंडीत पकडणे. राहुल दौऱ्यातही अंधारात, ओबीसी नेत्यांना भाव देऊ नका. वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांना काँग्रेसला आपला उमेदवार आणि नेता म्हणून घोषित करायचे आहे.